गुन्हे विश्व

धक्कादायक घटना! माजी सरपंचानेच केला तरूणाचा खून

मोकळया प्लॉटवर लाईट आणि इतर सुविधा उपलब्ध न करून दिल्यामुळे शिवीगाळ केल्याचा राग आल्यामुळे एका माजी सरपंचाने साथीदाराच्या मदतीने तरूणाचा खून केल्याची घटना उघडकीस आले आहे. पुणे पोलिसांनी कात्रजमधील मांगडेवाडीतील खूनाची उकल केली आहे. विकास रमेश चव्हाण (रा. गुजरवस्ती, कात्रज माजी सरपंच पेजरवाडी, भोर) आणि सचिन जालिंदर डाकले (रा. उत्कर्ष सोसायटी कात्रज ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मोहन चौंडकर (वय 32) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांगडेवाडीतील एका अर्धवट बांधकाम असलेल्या इमारतीत 18 मेला रात्री अकराच्या सुमारास आरोपी विकास, जालिंदर आणि मोहन दारू पित बसले होते.

आरोपी विकासने काही दिवसांपुर्वी मोहनला मध्यस्थी करून मोकळा प्लॉट घेऊन दिला होता. मात्र, विकासने त्यावर लाईटसह इतर सुविधा उपलब्ध केल्या नव्हत्या. त्यामुळे मोहनने विकाससह सचिनला शिवीगाळ केली. त्याचा राग आल्यामुळे विकास आणि सचिनने मिळून मोहनच्या डोक्यात विटांनी जबरी मारहाण करून त्याचा खून केला. त्यानंतर दोघेही आरोपी साताऱ्यातील शिरवळ फाटा परिसरात पळून गेल्याची माहिती पोलीस नाईक संजय भापकर यांना मिळाली. त्यानुसार पथकाने दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी खुनाची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

आरोपी भोरमधील ग्रामपंचायतीलचा माजी सरपंच

आरोपी विकास चव्हाण भोरमधील पेजरवाडीचा माजी सरपंच आहे. सद्या तो ग्रामपंचायतीचा विद्यमान सदस्य आहे. सरपंचानेच साथीदाराच्या मदतीने तरूणाचा खून केल्यामुळे खळबळ उडाली आहे .

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

7 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

7 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago