बीड : शुल्लक भांडणाच्या कुरापतीवरून झालेल्या भांडणात दोन सख्ख्या भावांची हत्या झाली आहे. या घडनेनं बीडमध्ये खळबळ माजली आहे. बीड शहरापासून जवळच असलेल्या नागापूर या छोट्याशा गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणातील आरेापी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
जुन्या भांडणाची कुरापत काढत मोबाईलवरून शिवीगाळ करणार्या तरूणाच्या घरच्यांना सांगण्यासाठी दोन भाऊ शेतातून गावात आले. शेतातून गावात आलेल्या दोन भावांवर संबंधित तरूणाने कुर्हाडीने हल्ला चढवत सपासप वार केले. या हल्ल्यात एका भावाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसर्या भावाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची थरारक घटना नागापूर येथे सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली.
या प्रकरणातील आरोपी परमेश्वर साळुंके फरार आहे. सदरच्या हत्याकांडाने जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे.बीड तालुक्यातील नागापूर येथील परमेश्वर साळुंके आणि राम आत्माराम साळुंके, लक्ष्मण आत्माराम साळुंके यांच्यात गेल्या महिनाभरापुर्वी किरकोळ भांडण झाले होते. सदरचे भांडण हे गावपातळीवर ज्येष्ठांच्या मदतीने सोडवण्यात आले होते. विशेष म्हणजे एक महिना यांच्यात कुठलीही कुरबुर झाली नाही.
दरम्यान, सोमवारी रात्री परमेश्वर साळुंके याने राम आणि लक्ष्मण यांना फोन करुन शिवीगाळ केली. त्यामुळे राम, लक्ष्मण ही दोन्ही भावंड परमेश्वर शिवीगाळ करतो म्हणून त्याच्या आई, वडिलांना सागंण्यासाठी शेतातून गावात आली. परमेश्वर घरापासून हाकेच्या अंतरावर कुर्हाड घेवून उभा होता. राम, लक्ष्मण घराच्या दिशेने येत असल्याचं दिसताक्षणी परमेश्वरने आपल्या हातातील कुर्हाडीने दोघांवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. या अनपेक्षित हल्ल्यात राम आणि लक्ष्मण दोघेही रक्तबंबाळ झाले. घटनास्थळीच राम याचा मृत्यू झाला तर लक्ष्मण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी बीड येथे दाखल करण्यात आले. परंतु, उपचारा दरम्यान दुसर्या भावाचाही मृत्यू झाला.
दोन्ही भावांच्या हत्येमुळे गावात भितीचं वातावरण पसरलं आहे. या प्रकरणातील आरेापी परमेश्वर साळुंके हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तसेच या सर्व प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…