ताज्याघडामोडी

पंढरपूरातील 15 खाजगी रुग्णांलयातील 540 बिलांची तपासणी 7 लाख 3 हजार 700 रुपये केले कमी

पंढरपूर(18):- कोरोना बाधित रुग्णांना खाजगी हॉस्पिटलमध्ये गोरगरीब व गरजू रुग्णांना वाजवी दरात उपचार  मिळावेतयासाठी  शासनाने उपचारासाठी  आकारावयाचे कमाल दर मर्यादा निश्चित केली आहे. अद्यापही काही खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांकडून  निश्चित केलेल्या दरापेक्षा आधिक दर आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी येत असल्याने  नियुक्त केलेल्या लेखापरिक्षण पथकामार्फत शहरातील 15 खाजगी रुग्णांलयातील  540  बिलांची तपासणी करुन 7 लाख 3 हजार 700 रुपये कमी करण्यात आले असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोना बाधित रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत. यासाठी प्रशासनाकडून पंढरपूर तालुक्यात 19 डेडीकेडेड कोविड हॉस्पिटल व डेडीकेडेड कोविड हेल्थ सेंटरला मान्यता देण्यात आली आहे. राज्यशासनाने कोरोनाच्या उपचारासाठी चाचणी तसेच रुग्णालयातील उपचाराबाबत रक्कम निश्चित केली असतानाही खाजगी रुग्णालयाकडून जादा बिलाची आकारणी  केली जात असल्याची तक्रारी येत आहेत. खाजगी रुग्णालयांनी कोरोनाबाधित तसेच इतर रुग्णांच्या उपचारासाठी शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार आकारणी करावी असे आवाहनही प्रांताधिकारी ढोले यांनी केले आहे.   

गरीब व गरजू रुग्णांचे हित डोळ्यासमोर ठेवून खाजगी रुग्णालयांनी जास्तीत-जास्त गरजू रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचाही लाभ मिळवून द्यावा असे, आवाहनही श्री.ढोले यांनी यावेळी केले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी विद्यानिकेतनचे अभिमानास्पद यश!

पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…

3 days ago

पंढरपूर सिंहगडच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागात पालक मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उत्साहात संपन्न

पंढरपूर : प्रतिनिधी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

2 weeks ago

स्त्रीशिक्षणाच्या क्रांतीची मशाल : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात विनम्र अभिवादन

पंढरपूर | प्रतिनिधी एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे मंगळवार, दि. १०…

3 weeks ago

राज्यस्तरीय ‘डिपेक्स’ प्रकल्प स्पर्धेमध्ये कर्मयोगी पॉलिटेक्निकचे घवघवीत यश

तंत्रज्ञानाच्या कुंभमेळ्यात कर्मयोगीच्या विद्यार्थ्यांचे यश नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय तंत्रज्ञान व प्रकल्प प्रदर्शनामध्ये कर्मयोगी इन्स्टिट्यूट…

3 weeks ago

पंढरपूर पंचायत समितीचा नूतन सभापती कोण ? ईश्वर चिट्ठी कि पालकमंत्री गोरे करणार फैसला ?

वसंत देशमुख-प्रमोद देशमुख यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष मागील महिन्यात पार पडलेल्या सोलापूर जिल्हा परिषद -तालुका…

3 weeks ago

विविध राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये कर्मयोगी पॉलिटेक्निक संघाचे उल्लेखनीय यश

इंटर इंजिनियरिंग डिप्लोमा स्टूडेंट स्पोर्ट असोसिएट यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धेमध्ये कर्मयोगी…

3 weeks ago