नवी दिल्ली: भारत सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे भारतात सध्या दररोज दोन ते तीन लाखांच्या जवळपास कोरोना रुग्ण आढळत आहेत. काही राज्यांनी कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारला आहे. देशात सध्या कोरोनाबाधित संख्या नियंत्रणात येत असली तरी रुग्णांचा मृत्यूदर ही चिंतेची बाब आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी भारत सरकारननं सध्या तीन लसींच्या वापराला परवानगी दिलेली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड, भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि रशियाची स्पुतनिक वी या तीन कोरोना प्रतिबंधक लसींद्वारे लसीकरणाचा कार्यक्रम सुरु आहे.
येत्या काळात आणखी पाच लसींच्या वापरांना मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे.
पुढील सहा महिन्यात 216 कोटी लसी उपलब्ध होणार
कोविड-19 मुळे भारतात आतापर्यंत 2 लाख सत्तर हजार व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. केंद्र सरकारच्या वतीनं नीति आयोगाचे सदस्य वी.के. पॉल यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन डिसेंबर पर्यंत भारताला 216 कोटी डोस उपलब्ध होतील असं म्हटलं होतं. यासाठी भारत सरकार येत्या काळात आणखी काही लसींना परवानगी देण्याची शक्यता आहे. यामध्ये परदेशातील काही आणि काही भारतीय लसींचा समावेश असू शकतो.
कोणत्या नव्या लसी उपलब्ध होणार
झायडस कॅडिला
भारतामध्ये झायडस कॅडिला ची लस तयार होत आहेय केंद्रीय मंत्री प्रकाश जावड़ेकर यांनी एक ट्विट करुन या विषयी माहिती दिली होती. झायडसच्या लसीची चाचणी तिसऱ्या टप्प्यात आहे. झायडसनं कोरोना लसीच्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर मंजुरी मिळाली की लगेच उत्पादनाला सुरुवात करु , असं म्हटलं आहे. झायडसद्वारे या वर्षी 5 कोटी लसी बनवू असं सागंण्यात आलं आहे.
नोवावॅक्स
अमेरिकेची कंपनी नोवावैक्स वॅक्सिनची निर्मिती करत आहे. त्याच कंपनीच्या फार्म्युलावर भारतात कोवावॅक्स नावाची लस तयार करण्याचं काम सीरम इन्स्टिट्यूट करत आहे. सप्टेंबर 2021 पर्यंत ही लस लाँच होईल, असा अंदाज आहे.
बायोलॉजिकल ई वॅक्सिन
हैदराबादमधील कंपनी बायोलॉजिकल ई लिमिटेड (BE) हे वॅक्सिन तयार करत आहे. ही वॅक्सिन सध्या फेज-3 ट्रायल मध्ये आहे. लवकरचं त्याचं उत्पादन सुरु होण्याची आशा आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार या वॅक्सिनचे ३० कोटी डोस ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान उपलब्ध होणार आहेत. कंपनीनं त्यांची लस सर्वात कमी किंमतीची असेल, असा दावा केला आहे.
भारत बायोटेक नोजल वॅक्सिन
ही नाकावाटे दिली जाणारी लस आहे. भारत बायोटेक या लसीची निर्मिती करत आहे. याच्या क्लिनिकल ट्रायलसाठी डीजीसीआयकडे परवानगी मागण्यात आली आहे. याच्या ट्रायल अद्याप सुरु झालेल्या नाहीत.
जेनोवा
पुणे येथील जेनोवा फार्मास्युटिकल देखील लस बनवत आहे. लवकरच जेनोवा फार्मास्युटिकलला परवानगी मिळण्याची शक्यता आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…