बीड : बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. अशातच योग्य वेळी वैद्यकीय सोय उपलब्ध न झाल्याने एका माजी सैनिकाला आपला जीव गमवावा लागला आहे. व्हेंटिलेटर बेड न मिळाल्याने पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असतानाच त्या माजी सैनिकांचा वाटेत मृत्यू झाला.
त्यांना कोरोनाची लागण झाली होती. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना बीड जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. पण येथे बेड उपलब्ध नसल्याने त्यांना नगर रस्त्यावरील लाईफ लाईन या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांना श्वास घेण्यात अडचण असल्याने त्यांना व्हेंटिलेटर बेडची आवश्यकता होती.
दहा दिवस पायपीट करुन देखील बेड मिळाला नाही. त्यानंतर त्यांना पुण्यातील मिलिटरी रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांनी आपला जीव सोडला. या घटनेनंतर आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…