ताज्याघडामोडी

आधार कार्ड नसेल तरीही आता कोरोनाची लस मिळणार, UIDAI चे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : युनिक आयडेंटिफिकेशन ऑफ इंडिया अर्थात यूआयडीएआयने स्पष्ट केलं आहे की एखाद्या व्यक्तीकडे आधार कार्ड नसेल तर त्याला कोरोनाच्या लसीपासून वंचित ठेवता येऊ शकत नाही. त्यामुळे एखाद्याकडे आधार कार्ड नसेल तरीही त्या व्यक्तीला कोरोनाची लस मिळणार आहे. तसेच कोणत्याही रुग्णाला, त्याच्याकडे केवळ आधार कार्ड नाही या कारणाने त्याला रुग्णालयात भरती न करणे किंवा औषधांची आणि उपचारांची सुविधा देण्यास नकार देणं या गोष्टी आता बंद होणार आहेत. या कारणांसाठीही आता आधार बंधनकारक नसणार असल्याचं UIDAI ने स्पष्ट केलं आहे.

अत्यावश्यक सेवांसाठी आता आधारची गरज नाही
देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना UIDAI चा हा निर्णय महत्वपूर्ण मानला जातोय.
या आधी अनेकदा केवळ आधार कार्ड नसल्याने लोकांना अत्यावश्यक सेवा तसेच अनेक वस्तूंपासून वंचित ठेवलं जायचं. कोरोना रुग्णाना रुग्णालयात भरती करताना आधार कार्ड नसल्याने अनेक अडचणी येत होत्या. तसेच उपचार आणि औषधांसाठीही या गोष्टी घडताना दिसत होत्या. आता UIDAI च्या स्पष्टीकरणामुळे या गोष्टीवर पडदा पडला आहे.

देशात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या रुग्णांना रुग्णालयात भरती करताना आधार कार्ड नसल्याने अनेकदा ऑनलाईन व्हेरिफिकेशन होत नव्हतं. त्यामुळे रुग्णालयेही अशा रुग्णांना भरती करुन घ्यायला नकार द्यायचे. आता या गोष्टीसाठी आधार कार्डची गरज नसल्याने अनेकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोरोनाची लस घ्यायची असेल तर आपली ओळख म्हणून आधार कार्ड दाखवणं बंधनकारक करण्यात आलं होतं. त्यामुळे ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्यांना लस मिळणार नाही का असा प्रश्न उपस्थित झाला होता. तसेच गेली चार महिने यावर कोणतेही स्पष्टीकरण केंद्र सरकार वा UIDAI कडून आलं नव्हतं. त्यामुळे अनेकांच्या संभ्रमात वाढ झाली होती. आता हा प्रश्न सुटला असून एखाद्याकडे आधार कार्ड नसले तरीही त्याला आता कोरोनाची लस मिळणार आहे हे स्पष्ट झालं आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

स्वेरीमध्ये ‘नॅशनल एज्युकेशन डे’ उत्साहात साजरा

पंढरपूर - गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये यंदाचा ‘राष्ट्रीय शिक्षण…

2 days ago

पंढरपुरात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रोबोटिक,लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ.शैलेश पुणतांबेकर यांची सेवा उपलब्ध

लाईफलाईन हॉस्पिटल येथे कॅन्सरसह विविध गंभीर आजारावर शस्त्रक्रियांची सोय डॉ. शैलेश पुणतांबेकर हे पुण्यातील एक…

6 days ago

स्वेरीमध्ये अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटरसाठी नीति आयोगाबरोबर सामंजस्य करार

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन…

1 week ago

येत्या शनिवारी स्वेरीत माजी विद्यार्थी मेळावा आणि पदवीप्रदान समारंभ

पंढरपूर- ‘गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा 'माजी विद्यार्थी मेळावा' आणि ‘पदवीप्रदान समारंभ’ स्वेरी कॉलेज कॅम्पस मध्ये येत्या…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे कृत्रिम बुद्धिमत्ता व व्हिजन तंत्रज्ञानावर चर्चा

पंढरपूर सिंहगडमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन: पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 week ago