दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या विरोधात मोठ्या प्रमाणात पोस्टर्स लावण्यात आल्याचे आढळून आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी ही पोस्टर्स लावणाऱ्यांच्या विरोधात मोहीम हाती घेतली आहे. याप्रकरणी त्यांनी 17 गुन्हे दाखल केले असून आतापर्यंत पंधरा जणांना अटक केली आहे.
ही पोस्टर्स प्रामुख्यान लसींच्या तुटवड्याबद्दल तक्रार करणारी आहेत. मोदीजी हमारे बच्चोंके व्हॅक्सिन विदेश क्यु भेज दिया असा प्रश्न यात पंतप्रधानांना उद्देशून विचारण्यात आला होता. त्यावर पोलिसांना कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यानुसार त्यांनी विविध कलमांखाली गुन्हे नोंदवले. कोणाच्या आदेशानुसार ही पोस्टर्स लावण्यात आली याची चौकशी केली जात असून त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
उत्तरपूर्व दिल्लीत या प्रकरणी दोन जणांना, पश्चिम दिल्लीत तीन जणांना, आऊटर दिल्लीत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. मध्य दिल्लीत या प्रकरणात दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून तेथेही चार जणांना अटक करण्यात आली आहे. दिल्लीच्या द्वारका, शहादरा, आदीभागातही ही पोस्टर्स लावल्याचे आढळून आले आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…