कोरोना रुग्णसेवा व मदत कार्यासाठी शिवसेनेची समिती स्थापन

शिवसेनेचे उपनेते,सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख आ.डॉ.तानाजीराव सावंत यांनी पंढरपुर विभागातील पंढरपूर,सांगोला,माळशिरस,माढा,करमाळा तालुक्यातील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी पंढरपूर येथे बैठक घेतली होती. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार या भागातील कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी तसेच शासकीय योजनांचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी एक समिती स्थापन करण्याची सूचना आ.तानाजी सावंत यांनी केली होती.
आज सदर समितीची घोषणा करण्यात आली असून या समितीमध्ये साईनाथ अभंगराव (अध्यक्ष),धनंजय डिकोळे (उपाध्यक्ष),संभाजीराजे शिंदे (सचिव),महावीर देशमुख(कार्यध्यक्ष),सूर्यकांत घाडगे(समन्वयक),तर सदस्य म्हणून स्वप्नील वाघमारे, दत्ता पवार,सुधीर अभंगराव,भरतभाऊ आवताडे,सचिन बागल,मधुकर देशमुख,नामदेव वाघमारे,सुधाकर लावंड  ,आशाताई टोणपे,गणेश इंगळे यांचा समावेश आहे. पंढरपुर उपविभागा अंतर्गत कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येणार्‍या अडचणी,ऑक्सिजन,रेमिडिसीवीरचा पुरवठा,बेडची उपलब्धता,महात्मा फुले जनआरोग्य योजने सारख्या योजनांचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी साहाय करणे,शासनाच्या नियमानुसार कोरोना रुग्णावर उपचाराचे दहा दिवसाचे बिल जास्तीत जास्त 57 हजार रुपये आकारण्यात येते का याची पाहणी करणे.कोरोना बाधीतांना आवश्यक असलेले औषधे रास्त दरात उपलब्ध करुन देणे,हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या नावाचा फलक हॉस्पिटलच्या दर्शनी भागात लावणे,शासनाने स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून जाहीर केलेले अन्नधान्य वाटप सुरळीतपणे होते कि नाही याची दक्षता घेणे,राज्य सरकारने जाहीर केलेले 1500 रुपयांचे अर्थसहाय पात्र रिक्षा चालक व बांधकाम कामगार यांना मिळाले पाहिजे यासाठी पाठपुरावा करणे तसेच वेळोवेळी नागिरकांकडून प्राप्त होणार्‍या तक्ररीचे निराकरण करण्यासाठी पाठपुरावा करणे आदी जबाबदारी या समितीच्या माध्यमातून पार पाडली जाणार असल्याची माहीती शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे यांनी दिली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

13 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

14 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago