बिबवेवाडीत मध्यरात्री सराईतच गुन्हेगाराचा सिमेंट ब्लॉक डोक्यात घालून खून करण्यात आला. याप्रकरणी दोघांना बिबवेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. व्हॉटसअप वरील स्टेटसवरुन झालेल्या वादातून हा खून झाला.
माधव हनुमंत वाघाटे (वय 28, रा. सहकारनगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. वाघाटे हा भारती विद्यापीठ व सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये शरीराविरुध्दचे गुन्हे दाखल आहेत.
त्याला शहर व जिल्हयाच्या हद्दीतून तडीपार करण्यात आले होते. तडीपारीची मुदत संपल्यावर त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती.याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात 10 जणांच्या टोळक्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार माधव वाघाटेचा, सुनिल खाटपे व सारंग गवळी हे एकमेकांच्या परिचायाचे आहेत. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास सुनिल खाटपे व सारंग गवळी यांच्यामध्ये भांडणे झाली. सारंग गवळी याने कामठे नावाच्या तरुणाचे व्हॉटसअपवर स्टेटस ठेवले होते.
सुनिल खाटपे व कामठे यांच्यामध्ये वितुष्ठ असल्याने खाटपे याने गवलीला हे स्टेटस काढण्यास सांगितले होते. यातूनच त्यांच्यामध्ये वादावादी होऊन झटापट झाली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…