गुन्हे विश्व

13 वर्षाच्या मुलाकडून 25 वर्षीय मोठ्या भावाची हत्या; धक्कादायक कारण आलं समोर

ठाणे | ठाणे येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलाने आपल्याच मोठ्या भावाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लहान मुलाने असं कृत्य केल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र तपास केल्यानंतर धक्कादायक कारण समोर आलं आहे.

संबंधित मृत मोठ्या भावाचं नाव हफिजुल्लाह अन्सारी असं आहे. हफिजुल्लाह भिवंडीतील ओवळी येथील एका कंपनीमध्ये हमालीचं काम करत होता. एक महिन्यापुर्वी आपल्या 13 वर्षांच्या लहान भावाला उत्तर प्रदेश वरुन बोलावून हफिजुल्लाहने त्याला देखील त्या कंपनीमध्ये कामाला लावलं. दोघे भाऊ भिवंडीतील एका खोलीत राहत होते.

1 मे रोजी दोघा भावांचा पगार झाला. यामध्ये छोट्या भावाला देखील 7 हजार रुपये मिळावे. मात्र आपला भाऊ छोटा असल्यामुळे हफिजुल्लाहने त्याच्या कडून पैसे काढून घेतले. याच रागात हफिजुल्लाहच्या लहान भावाने हफिजुल्लाहच्या डोक्यात लाकडी पळिनं वार केला. यादरम्यान हफिजुल्लाह बेशुद्ध झाला. त्यानंतर आपल्या भावाच्या तोंडात बोळा कोंबून हफिजुल्लाहच्या लहान भावाने त्याची बेदम मारहाण केली. यामध्ये हफिजुल्लाहचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, संपूर्ण प्रकारानंतर हफिजुल्लाहच्या भावाने घराला बाहेरुन कुलुप लावलं आणि बाहेरच झोपी गेला. मात्र परिसरात दुर्गंध पसरु लागल्याने तेथील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर पोलिसांनी मृत हफिजुल्लाहच्या भावाची चौकशी केली असता, त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी लहान भावाला ताब्यात घेतलं असून पुढील कार्यवाही केली जात आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

7 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago