गुन्हे विश्व

3 लाखांचे बिल भरले नाही म्हणून रुग्णाला ठेवले हॉस्पिटलमध्ये डांबून, तब्बल 12 तासानंतर सुटका

नाशिक, 15 मे : बिल भरले नाही म्हणून नाशिकमध्ये एका खासगी हॉस्पिटलने कोरोना रुग्णाला डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित रुग्णाच्या मुलाने मदत मागितल्यानंतर तब्बल 12 तासांनी या रुग्णाची हॉस्पिटलमधून रुग्णाची सुटका करण्यात आली.

घडलेली हकीकत अशी की, नाशिकच्या गंगापूर रोडवरील मेडिसिटी या हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या श्रीधर दिघोळे नामक रुग्णाच्या मुलाचा फोन आला आणि त्याने आपल्या वडिलांना हॉस्पिटल बिल भरत नसल्याने सोडत नसल्याची तक्रार केली.  यानंतर न्यूज 18 लोकमतची टीम रुग्णालयात दाखल झाली आणि या मुलाची तक्रार जाणून घेतली.

ज्या रुग्णाचं बिल शासन नियमाप्रमाणे केवळ 1 लाख रुपये व्हायला हवं त्या रुग्णाला या मेडिसिटी हॉस्पिटलने तब्बल 3 लाख 45 हजाराचं बिल आकारलं होतं,असं असतांना या रुग्णाचा मुलगा शासकीय दराने बिल भरण्यास देखील तयार होता. मात्र मुजोर हॉस्पिटल प्रशासनाने या मुलाला दाद दिली नाही. अखेर या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनीही हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. मात्र, तेंव्हा देखील हॉस्पिटलने दारात बाऊन्सर उभे करत कुणालाच आत जाऊ दिलं नाही, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अखेर हॉस्पिटलच्या बाहेरच ठिय्या मांडला.

या नंतर तब्बल एक तासाने आमच्या प्रतिनधिंनी पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि त्या नंतर 5:30 वाजता गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंचल मुदगल हे त्यांच्या फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ही या मुलाची तक्रार जाणून घेत हॉस्पिटलला बिल शासकीय नियमा प्रमाणे आकरण्याची विनंती केली. मात्र. या पोलिसांनाही हॉस्पिटल प्रशासनाने उडवाउडवीची उत्तरे देत रुग्णाला सोडण्यास नकार दिला. हा खेळ देखील तब्बल 1 तास सुरू होता पोलिसांना हॉस्पिटल जुमानत नसल्याने आमच्या प्रतिनिधींनी नाशिक महानगर पालिकेचे मुख्यलेखा परीक्षक बी जे सोनकांबळे यांना हॉस्पिटलला पाचारण केले. या नंतर 6:30 वाजता हे अधिकारी हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा या अधिकार्‍यांनाही या हॉस्पिटलमध्ये आत मध्ये सोडण्यास मज्जाव केला गेला.

मात्र नंतर आतमध्ये गेल्यानंतर या अधिकाऱ्यांनी हॉस्पिटल प्रशासनाची सगळीच पोलखोल केली. बिलात पीपीई किट,बेड चार्जेस आणि इतर चार्जेस आवास्तव असल्याचा ठपका ठेवत 3 लाख 45 हजाराचं बिल शासनाच्या नियमां प्रमाणे 1 लाख 35 हजारचं होत असल्याचं स्पष्ट करत इतकंच बिल भरून घेऊन रुग्णाला डिस्चार्ज करण्याच्या सूचना केल्या.

या दरम्यान मनपा अधिकाऱ्यांनी हॉस्पिटलची पाहणी केली असता बिलात ज्या कर्मचाऱ्याच्या नावे PPE किट लावले होते, त्या हॉस्पिटलमध्ये न PPE किट घातलेले कर्मचारी आढळून आले न पालिकेने ठरवून दिलेल्या 80 खाट्यातील बेडवर रुग्ण आढळून आले केवळ 20 टक्के बेडवर रुग्ण दाखल करून घेत असल्याची धक्कादायक बाबही समोर आली.आणि अखेर न्यूज 18 लोकमतच्या पुढाकाराने आणि मनसे पदाधिकारी, पोलीस आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या कार्यतत्परतेमुळे या रुग्णाची 7: 30 वाजता म्हणजे तब्बल 3 तासांनी या हॉस्पिटलमधून सुटका करण्यात आली.

या नंतर मनपा अधिकाऱ्यांनी हॉस्पिटलवर सील करण्याची कारवाई केली जाईल असं सांगितलं, तर पोलिसांनी या रुग्णांना न्याय मिळाला, असं म्हणत तक्रार आल्यास योग्य ती कारवाई करू, असे स्पष्टीकरण दिले आहे. तर मनसे पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणी मनपा आयुक्तांना या हॉस्पिटलवर कठोर कारवाई करण्यासाठी पत्रव्यव्हार केले जातील असं सांगितलं आणि पीडित मुलाने आपल्या वडिलांची सुटका केली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

14 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

14 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago