गेल्या काही महिन्यात सोलापूर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सोलापूर शहर पोलीस आयुक्त कार्यालयाकडून अनेक कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत.शहरातील अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्यात येत असून राजकीय हस्तक्षेपाची पर्वा न करता सोलापूर शहर पोलीस आपले कर्तव्य पार पाडत असल्याने शहरातील नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे.ज्या आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल आहेत,अशा आरोपीना सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार करणे,स्थानबद्ध करणे,अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपी विरोधात न्यायालयीन खटले गतीने चालविले जावेत यासाठी उपायोजना करणे आदी मार्ग अवलंबत सोलापूर शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यात शहर पोलीस आयुक्तालय यशस्वी ठरले आहे.पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार शहरातील विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असल्याने सराईत गुन्हेगार भरत किसन मेकाले याला सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या पोलिसांनी एमपीडीए कायद्यानुसार १३ मे रोजी स्थानबद्ध केले असून त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.
भरत मेकाले याच्या विरोधात १५ ते २० टक्क्यांपर्यंत व्याज घेत सावकारी करणे.दमदाटी करणे,जीवे मारण्याची धमकी देणे अशा गंभीर तक्रारी विविध पोलिस ठाण्यात दाखल होत्या . घातक शस्त्रानिशी हल्ला करणे, खंडणी मागणे, दुखापत करणे, जबरी चोऱ्या करणे, टोळी जमवून गैरकृत्य करणे अशा विविध गंभीर गुन्ह्यांसाठी पोलीस पोलीस त्याचा शोध घेत होते.
मेकाले याने सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण केली असल्याचे लक्षात आल्यामुळे त्याच्याविरुद्ध २०१९ व २०२० मध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मेकाले याच्याविरुद्ध जमीन बळकावणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल करण्यात आले. भरत मेकाले याच्याविरुद्ध वेळो-वेळी पोलीस कारवाई करूनही त्याच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने एमपीडीए अधिनियम १९८१ अन्वये स्थानबद्धतेचे आदेश काढण्यात आले होते. त्यानंतर अखेर त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…