आ.सावंत यांनी घेतला कोरोना उपायोजनांचा प्रशासनासमवेत आढावा
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे या कठीण काळात अतिशय तळमळीने काम करत आहेत. प्रशासन आणि राजकीय नेते यांच्यात समन्वय साधत कोरोनाच्या या दुसर्या लाटेत महाराष्ट्रातील जनतेला होणारा त्रास कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.तर कोरोना बाधीतांच्या उपचारासाठी कुठलीही कमतरता भासू नये यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन यांच्याशी सातत्याने संपर्क करुन माहीती घेत आहेत.कुठे उणीव जाणवत असेल तर राज्य सरकारच्या पातळीवर ती दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत.राज्यावर आलेल्या या भयानक संकट काळात राज्याचा सेनापती म्हणून मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे हे देत असलेला लढा यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने कुठलीही उणीव ठेवू नये असे आवाहन आमदार तानाजी सावंत यांनी केले आहे.बुधवारी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करुन विविध तालुक्यातील प्रशासनिक अधिकारी आणि कर्मचारी यांना केले आहे.तर त्या त्या तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी या संकटकाळात जनतेच्या संपर्कात राहून काम करीत आहेत.जनतेच्या अडचणी जाणून घेत त्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत हे लक्षात अधिकारी आणि शिवसेनिक यांनी समन्वय राखुन उपायोजना कराव्यात अशी अपेक्षा आ.तानाजी सावंत यांनी आपल्या जिल्हा दौर्यात विविध तालुक्यात बैठकांच्या माध्यमातून केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा शब्द आपल्यासाठी प्रमाण आहे.ते करीत असलेल्या सुचनांचे,आदेशाचे काटेकोर पालन केले जात आहे का नाही यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी व शिवसैनिकांनी पार पाडावी असे आदेशही त्यांनी शिवसैनिकांना दिले आहेत.
सोलापूर जिल्हयाचे शिवसेना संपर्क प्रमुख आ.तानाजी सावंत यांनी गुरुवार दिनांक 12 मे रोजी सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्याचा दौरा करुन त्या त्या तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्तेे यांच्याकडून कोरोना बाबतच्या उपायोजना,ऑक्सीजन रेमीडीसीवीर,लस उपलब्ध होण्यात येणार्या अडचणी,राज्यशासनाच्या महत्वकांक्षी महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ रुग्णांना मिळण्याबाबतच्या अडचणी जाणून घेतल्या तर ग्रामिण भागातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत ग्रामिण भागात ठिकठिकाणी जनजागृती करण्याचे पदाधिकारी व शिवसैनिकांना आदेश दिले.तर आरोग्य,महसूल आणि पोलीस विभगाच्या स्थानिक वरिष्ठ अधिकार्यांकडून माहीती घेत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ग्रामपंचयात ते तालुका पातळीवरील अधिकारी यांच्यात समन्वय ठेवत काम झाले पाहीजे,तरच कोरोनाच्या तीसर्या लाटेचे आवाहन आपण परतवून लावू असेही आ.तानाजी सावंत म्हणाले.कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी येणार्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक गावात शिवसेनेच्या वतीने हेल्पलाईन सेंटर सुरु केले जातील.त्यास प्रशासनाने सर्वतोपरी सहकार्य करावे,त्याच बरोबर कोरोना रुग्णांवर केल्या जाणार्या उपचारासाठी शासनाच्या आरोग्य विभागाने दर निश्चित केले आहेत.त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जावी,बीलांची तपासणी केली जावी अशा सुचनांनी त्यांनी प्रशासनाला केल्या.गावागावात ध्वनीवर्धकावरुन आरोग्य विषयक जनजागृती करण्यासाठी तातडीने उपायोजना करणे गरजेचे असल्याचे आ.सावंत यांनी सांगीतले.
आ.तानाजी सावंत यांनी पंढरपूर येथील विश्रामगृहात घेतलेल्या बैठकीत शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी पंढरपूर,मंगळवेढा,माळशिरस व सांगोला,माढा आणि करमाळा तालुक्यात कोरोना रुग्णावर उपचाराबाबत येणार्या अडचणी तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लॉकडाउनच्या काळात सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी जाहीर केलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणी बाबत स्थानिक प्रशासनाच्या पातळीवर येणार्या अडचणी मांडल्या,तर स्वस्त धान्य दुकानातून पुरवठा करण्यात येणारी डाळ निकृष्ट गेल्यावर्षीचा साठा असून वितरणासाठी डाळ बदलून मिळावी अशी मागणी केली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…