ताज्याघडामोडी

स्पुतनिक लसीबाबत केंद्र सरकारची महत्वाची घोषणा, लवकरच…

नवी दिल्ली – रशियाद्वारे निर्मित स्पुतनिक लस भारतात पोहोचली असून पुढील आठवड्यापासून ती लस लोकांना दिली जाईल, अशी अपेक्षा आहे. तसेच जुलैमध्ये स्पुतनिक लसीचं उत्पादन भारतात होण्यास सुरुवात होईल, अशी माहिती नीति आयोगाचे सदस्य वी के पॉल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

नीति आयोगाचे सदस्य वी के पॉल यांनी आज पत्रकार परिषद घेतली. पॉल यांनी भारतात आतातपर्यंत 18 कोटी लोकांना कोरोनाच्या लसी दिल्या गेल्या असल्याचं म्हटलं आहे. अमेरिकेमध्ये लसीकरण झालेल्या लोकांची संख्या 26 कोटी असून भारत तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. भारतामध्ये ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीमध्ये 216 कोटी कोरोना लसीचं उत्पादन केलं जाईल, अशी देखील माहिती देखील पॉल यांनी यावेळी दिली.

दरम्यान, स्पुतनिक-व्ही ही भारत सरकारकडून वापरण्यास देण्यात आलेली तिसरी लस आहे. तत्पूर्वी, सरकारने कोविशिल्ड आणि कोवाक्सिन वापरण्यास परवानगी दिली आहे. रशियाची ही लस भारतात सुरू असलेल्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात खूप मदत करेल. असा विश्वास आहे की यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यास मदत होईल.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

संभाजी शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समिती सदस्यपदी निवड

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख व पंचायत समितीचे माजी सदस्य, श्री विठ्ठल…

7 days ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूटमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

पर्यावरण संरक्षणसाठी संबोधनासह केले विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ…

1 week ago

एसकेएन सिंहगडच्या विद्यार्थिनीचे जागतिक स्तरावर दैदिप्यमान यश

कु. सोनिया नवले यांची अमेरिकेतील जागतिक कीर्तीच्या इलिनॉईस विद्यापीठातून एम.एस. पदवी संपादन एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाची उज्जल यशाची परंपरा कायम.

प्रथम वर्ष च्या निकालामध्ये जिल्ह्यात अव्वल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या…

1 month ago

पंढरपूर शहर तालुक्यातील शासकीय कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात यावी

संभाजी ब्रिगेडची प्रांताधिकारी पंढरपूर यांच्याकडे निवेदन देत मागणी    स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग चा ९२%निकाल

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…

2 months ago