सोलापूर जिल्ह्यात दरदिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी शंभरकर यांनी ८ मे ते १५ मे या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे.मेडिकल दुकाने वगळता सर्व व्यवसायिक आस्थपणा,किराणा दुकाने,भाजीपाला विक्री आदी बंद ठेवण्यात यावेत असे आदेश असताना करकंब येथील बसस्टँड परिसरातील भुषंण मटण शॉप,शुक्रवार पेठ करकंब येथील जयभवानी मटण शॉप, जगदंबा मटण शॉप, काऴुबाई मटण शॉप या ठिकाणी ग्राहकांना मटण विक्री केली जात असल्याचे आढळून आल्याने 1)महेश मारूती जवारी वय 36 रा करकंब ता पंढरपुर,2)श्रीरंग प्रकाश पलंगे वय 28, 3)गणेश छबुलाल पलंगे वय 37, 4)भागवत रतीलाल पलंगे वय 40, सर्वे रा करकंब ता पंढरपुर यांनी त्यांचे वरील मटण दुकाने उघडी ठेवुण मटण व चिकन विक्री करुन मा.जिल्हाधिकारी सो सोलापुर यांच्या आदेशाचा भंग करुन तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51(ब), महाराष्ट्र कोव्हीड अधि.2020चे कलम 11, साथीचे रोग अधि.1897चे कलम 2,3,4 चे भंग करुन तसेच हयगयीने व बेदरकार मानवी जिवित व व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य करुन संसर्ग पसरविण्याची घातक कृती केली आहे. म्हणुन त्यांनी भा.द.वि. कलम 188,269,राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51(ब) , महाराष्ट्र कोव्हीड अधि.2020चे कलम 11, साथीचे रोग अधि.1897चे कलम 2,3,4 प्रमाणे करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आपत्ती व्यवस्थापन कायद्याची कठोर अमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले असून करकंब पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या आमलबजावणी बरोबरच गेल्या काही दिवसात पोलीस ठाण्याच्या ह्दद्दतील विविध गावातून होणारी अवैध दारू विक्री व अवैध वाळू उपसा यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.करकंब येथील काही मटण चिकन विक्री करणाऱ्या दुकानातून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करत मटण चिकन विक्री केली जात असल्याचे निदर्शनास येताच करकंब पोलीस ठाण्याच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कारवाईमुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यवसायिकांवर मोठी जरब बसण्यास मदत होणार आहे.