सोलापूर जिल्ह्यात दरदिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी शंभरकर यांनी ८ मे ते १५ मे या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे.मेडिकल दुकाने वगळता सर्व व्यवसायिक आस्थपणा,किराणा दुकाने,भाजीपाला विक्री आदी बंद ठेवण्यात यावेत असे आदेश असताना आढीव तालुका पंढरपूर येथील किराणा दुकानदार रमेश लक्ष्मण खरात हे आपले ओम किराणा दुकान चालू ठेवून ग्राहकांना मालाची विक्री करत असल्याचे आढळून आल्याने तालुका पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात भा.द.वि.क.188,269,270सह आपत्ती व्यवस्थापन 2005चे कलम-51(B),साथीचे रोग प्रतिबंध अधिनियम 1897 चे कलम-2,3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दरदिवशी राज्यात कोरोना बाधितांची वाढत चाललेली संख्या लक्षात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात १५ एप्रिल पासून संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली.यातून केवळ भाजीपाला विक्री आणि किराणा व्यवसायिक याना सूट देण्यात आली होती.मात्र सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या आटोक्यात येत नसल्याने जिल्हाधीकारी सोलापूर यांनी भाजीपाला व किराणा खरेदीच्या नावाखाली घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या लक्षात घेत या बाबतही निर्बंध लागू केले.तरीही काही किराणा दुकानदार या आदेशाचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत असतानाच पंढरपुर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण अवचर यांच्या आदेशाने करण्यात आलेल्या या कारवाईमुळे जरब बसण्यास मदत होणार आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…