बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने केलेल्या मागणीनुसार राज्यातील वकिलांना 100 कोटी रुपये देण्याची मागणी ॲड. मंगेश लेंडघर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. ईमेल आणि ट्विट करून ही मागणी केली आहे.2 मे रोजी बार कौन्सिलने 100 कोटी रुपये मदत देण्याची मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे आहे. या पार्श्वभूमीवर ॲड. लेंडघर यांनी ही मागणी केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही मागणी करण्यात आली आहे.
करोनाचा न्यायालयाच्या कामावर मोठा परिणाम झाला आहे. वर्षांपासून न्यायालयाचे अंशतः काम सुरू आहे.सर्व घटकांना काही ना काही मदत केली आहे. वकील हा महत्वाचा घटक आहे. सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य वकील करतात.वकिलांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान दिले आहे. या सर्व बाबींचा विचार करून बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या अध्यक्षांनी केलेल्या मागणीनुसार वकिलांना ताबडतोब 100 कोटी रुपयांची मदत देण्याची मागणी ॲड. लेंडघर यांनी ठाकरे यांच्याकडे केली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…