ताज्याघडामोडी

पुण्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांवर भरदिवसा गोळीबार; सुदैवाने थोडक्यात बचावले

पुणे – आज एक धक्कादायक घटना पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. भरदिवसा गोळीबार पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर करण्यात आल्याची घटना घडली आहे. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे तान्हाजी पवार असे नाव आहे. आमदार अण्णा बनसोडे यांचे चिंचवड स्टेशनजवळ कार्यालय आहे. एका व्यक्तीने त्याच परिसरात बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आमदार बनसोडे यांच्या दिशेने गोळी झाडली. या गोळीबारात बनसोडे हे सुदैवाने बचावले असून, या घटनेत कुणीही जखमी झाले नाही.दुपारी दीडच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

आरोपी तान्हाजी पवार याला याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी अटक केली असून, गोळीबाराचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस याप्रकरणी योग्य ती कारवाई करतील, असे आमदार अण्णा बनसोडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

आमदार बनसोडे या घटनेविषयी बोलताना म्हणाले, अॅन्थनी म्हणून एक कंत्राटदार आहे. मी त्याला ओळखत नाही. तो आमच्याकडे तीन साडेतीन वर्षांपासून काम करत आहे. त्याचा तान्हाजी पवार म्हणून एक सुपरवायझर आहे. त्याला माझा पीए त्याला मागील दहा दिवसांपासून फोन करत आहे. दोन मुले कामाला घे, एवढेच त्याला सांगितले होते. त्याने बोलतानाच अरेरावी केली. तेवढेच झाले. त्यानंतर तो आज सकाळी आला. माझ्यासोबत त्याचे बोलणे झाले. मी त्याला विषय सोडून द्यायला सांगितले. मी याबद्दल त्याच्या मालकाशीही बोललो. दरम्यान, तो कार्यालयाच्या बाहेर आला आणि त्याने गोळीबारच केला. येताना तो पूर्वनियोजन करुनच आला असावा, कारण त्याने सोबत त्याचा साथीदार, त्याचा मेहुणा होता. त्यांच्याकडेही पिस्तुल असल्याचे आमदार बनसोडे म्हणाले.

आमच्यात कोणतीही वादावादी झाली नाही. वाद त्याने घातला. मग माझ्या कार्यालयात काही कार्यकर्ते होते. त्यांनी ते बघितले. त्याला त्यांनी शिवीगाळ केली. त्याने गोळीबार केल्यानंतर मुलांनी त्याला धक्का देऊन खाली पाडल्यानंतर त्याला मारहाण केली. त्याने तोपर्यंत दोन फैरी झाडल्या होत्या. पहिली गोळी माझ्या दिशेने झाडली. पण, एका मुलाने धक्का मारल्याने ती दुसऱ्या दिशेला गेली. त्याला कुणी पाठवले होते, याचा तपास पोलीस करत आहेत. कचऱ्याचा कंत्राटदार जर पिस्तुल बाळगणारे सुपरवायझर ठेवत असेल, तर कसे व्हायचे, असा सवालही बनसोडे यांनी उपस्थित केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अण्णा बनसोडे हे निकटवर्तीय असून, अजित पवारांनी फडणवीस यांच्या दुसऱ्या कार्यकाळात जेव्हा भाजपसोबत युती केली होती, तेव्हा आमदार अण्णा बनसोडे यांनीही त्यांना पाठिंबा दिलेला होता. ते अजित पवार यांचे विश्वासू आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 day ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago