साताराच्या खटाव तालुक्यातील पडळ येथील खटाव-माण एग्रो प्रोसिसिंग लि. पडळ या साखर कारखान्यावरील केमिस्ट अधिकारी जगदीप थोरात यांचा मारहाणीनंतर झालेल्या मृत्यूप्रकरणी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना मंगळवारी वडूज पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता शनिवार १५ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
साताराच्या खटाव तालुक्यातील पडळ येथील खटाव-माण एग्रो प्रोसिसिंग लि. पडळ या साखर कारखान्यावरील केमिस्ट अधिकारी जगदीप थोरात यांचा मारहाणीनंतर झालेल्या मृत्यूप्रकरणी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना मंगळवारी वडूज पोलिसांनी अटक केली.
त्यांना न्यायालयात हजर केले असता शनिवार १५ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
जगदीप थोरात यांच्या मृत्यूप्रकरणी वडूज पोलिसांत एकूण २० जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला होता. यापूर्वी सात ते आठ आरोपींना वडूज पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी उच्च न्यायालयात प्रकृतीचे कारण देत जामीन अर्ज दाखल केला होता. परंतु न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.
त्यांच्या विरुध्द अटक वॉरंट न्यायालयाने काढले होते. त्यानंतर सातारा येथे वैद्यकीय उपचारासाठी एका हॉस्पिटलमध्ये ते दाखल झाले होते. त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर वडूज पोलीसांनी त्यांना सातारा येथून ताब्यात घेतले.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…