ताज्याघडामोडी

सात दिवसात कोरोना बरा, असा दावा करणाऱ्या कंपनीने जाहीर केली औषधाची किंमत, जाणून घ्या

नवी दिल्ली | कोरोनाने सर्व देशभरात थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाची आकडेवारीही कमी-अधिक प्रमाणात वाढत आहे. महामारीच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोना वाढत असताना ऑक्सिजन, रेमडेसीविरचा तुटवडा असल्यानेही अनेकजण दगावले. त्यामुळे केंद्र सरकार शरीरातील ऑक्सिजनची कमतरता भरून निघेल या औषधांवर भर दिला आहे. अशातच झायडस कॅडिलाचं विराफिन हे हे अँटिव्हायरल औषध उपलब्ध झालं होतं. या कंपनीने औषधाचे दर जाहीर केले आहेत.

‘विराफिन’च्या एका डोसची किंमत 11,995 रुपये इतकी आहे, असं कंपनीने सांगितलं आहे. मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार कंपनीने हे औषध पाठवण्यास सुरुवात केली आहे. या औषधामुळे रुग्णांना ऑक्सिजनची गरज कमी भासेल असा दावा कंपनीने केला आहे. 

 

केंद्र सरकारकडून झायडस कॅडिलाच्या ‘विराफिन’ औषधाला आपातकालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. कोरोना गंभीर रुग्णांसाठी ‘विराफिन’ औषधाला देशातील शिखर संस्था असलेल्या ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आपात्कालीन मंजुरी द्यावी अशी मागणी कंपनीने ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियाकडे केली होती. डीसीजीआयने या औषधाला मंजुरी दिली आहे. आता या औषधाचा कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापर केला जाणार आहे.

 

दरम्यान, झायडस कॅडिला ही अहमदाबादमधील औषध कंपनी आहे. झायडस कॅडिलाचं इंटरफेरॉन अल्फा – 2 बी Interferon alpha-2b म्हणजे Virafin हे अँटिव्हायरल औषध. PegIFN म्हणूनही हे औषध ओळखलं जातं.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

स्वेरीमध्ये ‘नॅशनल एज्युकेशन डे’ उत्साहात साजरा

पंढरपूर - गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये यंदाचा ‘राष्ट्रीय शिक्षण…

3 days ago

पंढरपुरात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रोबोटिक,लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ.शैलेश पुणतांबेकर यांची सेवा उपलब्ध

लाईफलाईन हॉस्पिटल येथे कॅन्सरसह विविध गंभीर आजारावर शस्त्रक्रियांची सोय डॉ. शैलेश पुणतांबेकर हे पुण्यातील एक…

7 days ago

स्वेरीमध्ये अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटरसाठी नीति आयोगाबरोबर सामंजस्य करार

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन…

1 week ago

येत्या शनिवारी स्वेरीत माजी विद्यार्थी मेळावा आणि पदवीप्रदान समारंभ

पंढरपूर- ‘गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा 'माजी विद्यार्थी मेळावा' आणि ‘पदवीप्रदान समारंभ’ स्वेरी कॉलेज कॅम्पस मध्ये येत्या…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे कृत्रिम बुद्धिमत्ता व व्हिजन तंत्रज्ञानावर चर्चा

पंढरपूर सिंहगडमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन: पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 week ago