राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नीविषयी फेसबुक या समाज माध्यमावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र पंढरीनाथ काकडे (वय 52, रा. माऊली बंगलो, जिल्हा परिषद शाळे जवळ, वडगाव शिंदे, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आनंद रामनिवास गोयल (वय 44) यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र काकडे या फेसबुक प्रोफाईल वरून राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीच्या नावाचा उल्लेख करून आक्षेपार्ह मजकूर प्रसारीत करण्यात आला होता.
मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीची नीतिभ्रष्ट करण्याच्या उद्देशाने जाणून-बुजून फेसबुकवर पोस्ट टाकून घटनात्मक पदाचा व प्रतिष्ठित राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या लौकिकास बाधा आणणारे कृत्य करून त्यांची बदनामी केली आहे. त्यामुळे विमानतळ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमानतळ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…