ताज्याघडामोडी

आता समोर कोणताच मार्ग दिसत नाही”; व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ स्टेटस ठेवून तरुणाची आत्महत्या

भिवंडी : व्हॉट्सअ‌ॅपवर व्हिडीओ स्टेटस ठेवून एका तरुणाने नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडीमध्ये घडली असून मयूर रामा जाधव असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. कल्याण-पडघा मार्गावरील गांधारी पुलाजवळ सोमवारी ही धक्कादायक घटना घडली. नदीपात्रात शोध सुरु आहे.

मयूर हा कल्याण पश्चिम परिसरातील बारावे या गावात कुटुंबासह राहत होता. काल सकाळपासूनच तो दारुच्या नशेत होता, असे सांगण्यात येत आहे. धक्कादायक म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी मयूरने आपल्या मोबाईलवर एक व्हिडीओ बनवला होता. दारु ही माणसाच्या आयुष्यातील सर्वात वाईट गोष्ट असल्याचे तो या व्हिडीओमध्ये बोलत आहे.

या व्हिडीओमध्ये त्याने पुढे म्हटलं आहे की, ‘काही गोष्टी अशा घडल्या की आता समोर कोणताच मार्ग दिसत नाही. माझी आठवण जेव्हा काढाल तेव्हा हसून काढा. तुमच्या जीवनातील असा जोकर होता तो, आतून तुटलेला, मात्र तुम्हाला हसवत राहिला, असे म्हणत त्याने गांधारी पुलावरुन नदीपात्रात उडी घेतली.

व्हॉट्सअॅपमधील व्हिडीओ स्टेटसमुळे ही घटना समोर आली. यानंतर खडकपाडा आणि पडघा या दोन्ही पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अग्निशमन दलाच्या मदतीने मयूरचा शोध सुरु केला आहे. मात्र, मयूरने आत्महत्या का केली याचं कारण अद्यापही समजू शकलेले नाही. या प्रकरणी पडघा पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली असून मृतदेह शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

21 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago