पंढरपुर तालुक्यातील पुळूज येथील शेतकरी विजय मारुती गावडे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार विजय गावडे यांच्या पत्नीचे मामा व पंढरपूर तालुक्यातील चळे येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक तानाजी रामचंद्र बनसोडे यांनी पंढरपूर शहरातील कॅप्टन ट्रॅक्टर्सचे शोरूम माझ्याच मालकीचे आहे असे सांगत या शोरूम मधून ट्रॅक्टर खरेदीचा आग्रह करीत वेळेवेळी रोख स्वरूपात व आरटीजीएस व ऑनलाईन स्वरूपात १९ डिसेंबर २०१९ ते ६ मे २०२० या कालावधीत ३ लाख ८१ हजार ५०० रुपये देऊन देखील ट्रॅक्टर देण्यास टाळाटाळ केली व फिर्यादीने या बाबत माहिती काढली असता पांडुरंग ट्रॅक्टर्स हे शोरूम तानाजी रामचंद्र बनसोडे यांच्या मालकीचे नसल्याचे आढळून आले.त्यामुळे आपली फसवणूक झाली आहे अशी तक्रार विजय मारुती गावडे यांनी केलेल्या तक्ररीचे कागदपत्रे वरिष्ठ कायार्लयाकडून प्राप्त झाल्यानंतर पंढरपूर शहर पोलीस ठाण्याकडून या प्रकरणी फिर्याद दाखल करून घेण्यात आली असल्याचे दिसून येते.
या प्रकरणी फिर्यादी विजय मारुती गावडे यांनी दाखल केलेली फिर्याद पुढील प्रमाणे आहे
फिर्यादी जबाब ता . 03/05/2021विजय मारुती गावडे, वय 30 वर्षे, धंदा शेती/दुध व्यवसाय, रा. पुळुज, ता. पंढरपूर, जि. सोलापूर मो. 9881748124मी वरील प्रमाणे असुन वर नमुद पत्त्यावर माझे जन्मापासुन राहणेस आहे. मी शेती व रुक्मिणी दुध संकलन केंद्र चालवुन त्यापासुन मिळणाऱ्या उत्पन्नावर माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. आज दि. 03/05/2021 रोजी पंढरपूर शहर पोलीस ठाणेचे सपोनि मगदुम यांनी मला पोलीस ठाणेस बोलावुन मी पंढरपूर येथील पांडुरंग ट्रक्टर्सचे मालक तानाजी रामचंद्र बनसोडे यांनी फसवणुक केलेबाबत दिलेला तक्रार अर्ज, चौकशीची इतर कागदपत्रे व गुन्हा दाखल संबंधाने वरिष्ठ कार्यालयाकडुन प्राप्त केलेला अभिप्राय इ. कागदपत्रे दाखविली. तरी सदरबाबत माझे सांगणे खालीलप्रमाणे. इसम नामे तानाजी रामचंद्र बनसोडे हा माझ्या पत्नीचा सख्खा मामा आहे. तो जि. प. प्राथमिक शाळा, चळे येथे शिक्षक म्हणुन नोकरी करतो. तसेच फावल्या वेळात तो कप्टन कंपनीचे ट्रक्टर विकण्याचे काम करतो. तो जवळचा नातेवाईक असल्याने त्याचे व आमचे एकमेकांचे घरी जाणे-येणे होते. माहे डिसेंबर 2019 मध्ये मी त्यास शेती कामासाठी ट्रक्टर घेणार असल्याचे सांगितले. तेव्हा त्याने पंढरपूर येथील आहिल्या पुलाजवळ पांडुरंग ट्रक्टर्स या नावाने ट्रक्टर विक्रीचे शोरुम चालु केल्याचे व त्याच्याकडुनच कप्टन कंपनीचा नविन ट्रक्टर खरेदी करणेबाबत आग्रह केला. म्हणुन मी त्याचे नमुद शोरुममध्ये जावुन दि. 19/12/2019 रोजी त्यास माझे मित्र आण्णा शेंडगे, रामकृष्ण भोसले व नवनाथ खरात यांचेसमक्ष 2,65,000/- रु. रोख स्वरुपात दिले. पण त्याच्यावर विश्वास ठेवुन मी त्याच्याकडे दिलेल्या रोख रकमेबाबत पावती मागितली नाही. त्यानंतर त्याने दि. 24/12/2019 रोजी मला संपर्क मोबाईलवर संपर्क साधुन पांडुरंग ट्रक्टर्स या फर्मचा खाते क्र. 0130022310000119 वरती पाठविण्यास सांगितले. त्यावरुन मी त्याने दिलेल्या नमुद खात्यावरती माझ्या दुध संकलन केंद्राच्या खात्यावरुन ( जि.म.सह.बँक, सोलापूर, खाते क्र. 182002790000041) 1,00,000/- रु. आरटीजीएस द्वारे पाठविले. तसेच त्याचे सांगणेप्रमाणे दि. 04/01/2020 ते दि. 06/05/2020 या कालावधीत थोडे थोडे असे 16,500/- रु. हे त्याच्या पत्नीच्या नावे फोन पे द्वारे पाठविले. अशा पद्धतीने त्यास एकुण 3,81,500/- रु. ट्रक्टर घेण्याच्या बदल्यात दिले. पुर्ण रक्कम घेवुनही तानाजी बनसोडे हा ट्रक्टर देण्यास टाळाटाळ करु लागला असता मी त्याचे शोरुमबाबत माहिती काढली. तेव्हा ते किर्ती रामचंद्र मोरे, रा. पंढरपूर, जि. सोलापूर हिच्या नावे असल्याचे मला समजले. आमच्यातील व्यवहारा अगोदर मला तानाजीने बऱ्याच वेळा नमुद महिलेच्या घरी नेले होते. त्या दोघांचे कौटुंबिक संबंध आहेत. तसेच नमुद शोरुम हे रामचंद्र मोरे हा सुरवातीस चालवित असे. पण त्यास ट्रक्टरला गिऱ्हाईक बघुन विक्री करणे जमत नसल्याने त्याने तानाजी बनसोडे यास सदर व्यवहारात भागीदार म्हणुन घेतले. तेव्हापासुन तानाजी हा नमुद शोरुम हे त्याचेच असल्याचे लोकांना सांगुन ट्रक्टरची विक्री करीत असे. सदर व्यवहारामध्ये त्याने माझ्याप्रमाणे बऱ्याच लोकांची फसवणुक केली आहे. तानाजी बनसोडे हा कागदोपत्री पंढरपूर येथील पांडुरंग ट्रक्टर्स या शोरुमचा मालक नसला तरीही तोच त्याचे सर्व व्यवहार पाहतो. तरी दि. 19/12/2019 ते दि. 06/05/2020 या कालावधीत नातेवाईक नामे तानाजी पांडुरंग बनसोडे (पाटील), वय 45 वर्षे, रा. चळे, ता. पंढरपूर याने मला पांडुरंग ट्रक्टर्स, नविन सोलापूर रोड, पंढरपूर या फर्ममधुन कप्टन कंपनीचा (28 एच.पी.) नविन ट्रक्टर देण्याच्या नावाखाली व तो नमूद फर्मचा मालक असल्याचे सांगून माझ्याकडुन 3,81,500/- रु. घेवुन मला ट्रक्टर न देता माझी फसवणुक केली आहे. म्हणुन माझी त्याचेविरुद्ध कायदेशिर तक्रार आहे. माझा जबाब मी मराठीत लिहीला असुन तो मी वाचुन पाहिला. तो माझे सांगणेप्रमाणे बरोबर लिहीला आहे.