ताज्याघडामोडी

विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ; माजी आमदारासह चौघांवर गुन्हा दाखल

पुणे, 10 मे: विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याप्रकरणी पुण्यातील माजी आमदार बाळासाहेब उर्फ चंद्रकांत शिवरकर आणि त्यांचा मुलगा माजी नगरसेवक अभिजित शिवरकर यांच्यासह चौघांविरुद्ध कौटुंबीक हिंसाचाराप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शिवरकर यांची सून 37 वर्षीय स्नेहा अभिजित शिवरकर यांनी वानवडी पोलिसांत फिर्याद दिली असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणी 38 वर्षीय पती अभिजित शिवरकर, 69 वर्षीय सासरे बाळासाहेब शिवरकर, सासू कविता बाळासाहेब शिवरकर (वय 66) आणि सोनाली सिद्धार्थ परदेशी (वय 40) या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पती अभिजित हे माजी नगरसेवक आहेत. या चारही जणाविरुद्ध भादंवि कलम 498 अ, 323, 504, 506, 34 अन्वये फिर्याद देण्यात आली आहे. मानसिक आणि शारीरिक छळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचं फिर्यादीनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. वानवडी पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.

फिर्यादीनं दिलेल्या तक्रारीनुसार, मागील दोन वर्षांपासून शिवरकर कुटुंबीय सून स्नेहा अभिजित शिवरकर यांचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होते. त्याच बरोबर आरोपींनी पीडितेला जीवे मारण्याची धमकीही दिली असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. नोव्हेंबर 2019 पासून एप्रिल 2021 या कालावधीत पीडितेवर कौटुंबीक हिंसाचार केला जात होता.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

14 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago