गुन्हे विश्व

खळबळजनक! रेमडेसीवीर इंजेक्शनच्या रिकाम्या कुप्यात पाणी भरून विकले!

बुलडाणा, 09 मे : राज्यावर कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणा जीवाची बाजी लावून काम करत आहे. पण, अशा परिस्थितीही पैशाच्या हव्यासापोटी काही जण काळाबाजार करत आहे. बुलडाण्यात चक्क रेमडेसीवीर इंजेक्शनच्या रिकाम्या कुप्यात पाणी भरून काळाबाजार केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे, रुग्णालयाचा वॉर्ड बॉयच हा काळाबाजार करत होता.

बुलडाणा जिल्ह्यात रेमडेसीवीर इंजेक्शन्सचा काळाबाजार होत असल्याबाबत अनेक तक्रारी होत्या. त्या अनुषंगाने बुलडाणा गुन्हे शाखेच्या वतीने  शहरात या इंजेक्शन्सची काळाबाजारी करणाऱ्या 3 जणांना अटक करण्यात आली होती. हे तिघे जण बुलडाणा शहरातील नामांकित डॉ. मेहेत्रे व डॉ लद्दड यांच्या हॉस्पिटलचे वॉर्ड बॉय आहेत.

रेमडेसीवीर इंजेक्शन्सचा काळाबाजार करत असताना पकडण्यात आलेल्या तीन जणांकडून रेमडेसीवीर इंजेक्शन्सच्या रिकाम्या कुप्यात पाणी भरून रुग्णांच्या नातेवाईकांना विकले जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. 15 ते 20 हजार रुपयांमध्ये रेमडेसीवीर इंजेक्शनची विक्री केली जात होती.

या हॉस्पिटलमध्ये वापरल्या गेलेले रेमडेसीवीर इंजेक्शन्सच्या रिकाम्या कुप्यात पाणी भरून रुग्णांच्या नातेवाईकांना विकत असल्याची आरोपींनी कबुली दिली आहे.त्यामुळे या पाण्याने भरलेल्या रेमडेसीवीरच्या कुप्या किती जणांना विकल्या व त्याचा किती रुग्णांवर वापर करण्यात आला आहे, हे ही तपासावं लागणार आहे. ह्या संपूर्ण किळसवाण्या प्रकारामुळे कोरोना काळात माणुसकी ओशाळली असल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केल्या जात आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

4 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

4 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago