कल्याण : अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर नजीक असलेल्या वांगणी येथे शिला क्लिनिक ह्या खाजगी दवाखान्याच्या डॉ. उमाशंकर गुप्ता आणि त्याच्या महिला सहकारी डॉक्टरवर बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. गुप्ता यांनी कोरोनाबाधित रुग्णाला एका दिवसात बरं करण्याचा दावा करत समाज माध्यमावर एक व्हिडीओ व्हायरल केला होता.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या क्लिनिकमध्ये रुग्णांची गर्दी होत होती. त्यांच्या उपचार पद्धतीवर तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. हा सर्व प्रकार एबीपी माझाने प्रकाश झोतात आणला होता. अखेर या संपूर्ण प्रकाराची दखल आरोग्य विभागाने घेतलीय.
डॉ गुप्ता यांनी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा परिषद आणि आरोग्य विभाग ठाणे यांची कोणतीही परवानगी नसताना वांगणी येथे आपले क्लिनीक थाटले होते. तसेच कोरोना काळात कोणतेही नियम न पाळता, मास्क न लावता, सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेत नसल्याचा ठपका ठेवत अखेर ह्या डॉक्टरवर बदलापूर ग्रामीण पोलिसांनी अंबरनाथचे डॉ. सुनील बनसोडे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप त्यांना अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…