नाशिक, 08 मे : नाशिकमध्ये शिवसेनेचे पदाधिकाऱ्याने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आळी आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही, मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नाशिक येथील पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. उमेश नाईक असं या पदाधिकाऱ्याचे नाव आहे.असे वृत्त टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे. उमेश नाईक हे काळाराम परिसरात राहत होते. त्यांचे जुने घर हे नागचौक परिसरात आहे. शुक्रवारी उमेश नाईक आपल्या पत्नीला जुन्या घरी जात असल्याचे सांगितले. घरात रंगकाम करायचे आहे, त्यामुळे जाऊन येतो असा निरोप त्यांनी पत्नीला दिला. नागचौक येथील जुन्हा घरी पोहोचल्यानंतर उमेश यांनी घरातील स्लॅबला दोर लावून गळफास घेतला.
बराचं वेळ झाल्यामुळे उमेश नाईक घरी परतले नसल्यामुळे कुटुंबीयांनी फोन करून विचारणा केली, पण त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. शेवटी जुन्या घरी जाऊ पाहणी केली असता उमेश यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला.
गेल्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत असल्यामुळे चिंतातूर होते. त्यामुळे गळफास लावून उमेश यांनी आपली जीवनयात्रा संपवली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…