वांगणी, 08 मे : कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्यातील डॉक्टर आणि आरोग्य यंत्रणा जीवाची बाजी लावून काम करत आहे. मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या रुग्णांना बाहेर काढत आहे. पण, मुंबई जवळील बदलापूर येथील वांगणी इथं एक डॉक्टर मास्क न वापरा कोरोना रुग्णावर उपचार करत असल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी डॉक्टरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बदलापूर येथील वांगणीमध्ये डॉ.उमाशंकर गुप्ता असं या डॉक्टराचं नाव आहे. वांगणीमध्ये शिला क्लिनिक नावाने छोटेखानी दवाखाना उभारला आहे. या डॉक्टराचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. कोरोनाबाधित रुग्ण आपण बरे केले असल्याचा दावा त्याने केला आहे. ऑक्सिजन लेव्हल कमी झालेल्या रुग्णांसुद्धा आपण काही तासांत बरे केल्याचा दावाही गुप्ता यांनी केला असून रुग्णांकडून तसे बोलवून सुद्धा घेतले आहे.
धक्कादायक म्हणजे, डॉ. गुप्ता स्वत: मास्क वापरत नाही आणि इतर रुग्णांना सुद्धा मास्क न वापरण्यास सांगत आहे. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली. त्यानंतर बदलापूर ग्रामीण पोलिसात रितसर तक्रार दाखल केली. आरोग्य अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून डॉ. गुप्ता आणि त्याची सहकारी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाचा संसर्ग पसरवण्यासाठी कारणीभूत ठेवण्याचा ठपका ठेवून शासकीय नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे, कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची या डॉक्टराकडे कोणतीही परवानगी नव्हती. तरी सुद्धा रुग्णांना दाखल करून उपचार करत होता.
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…