अखेर अपेक्स केअर कोविड हॉस्पिटलचा परवाना रद्द

अंत्यसंस्कारासाठी मृतदेहाची १४ तास अडवणूक

पंढरपुरात ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने पंढरपुरातील एका ७५ वर्षीय कोरोना बाधित वृद्ध महिलेस सांगली येथील अपेक्स केअर हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.पाच दिवस तेथे ऍडमिट असलेल्या वृद्धेस सोबत असलेल्या नातवास व सुनेस देखील भेटू दिले नाही.ती वृद्ध महिला ३० एप्रिल रोजी मरण पावली असता अडीच लाख रुपये भरल्याशिवाय मृतदेह ताब्यात देणार नाही असे बजावण्यात आले.तर इतके पैसे भरण्यास नकार देणाऱ्या नातवास बाउन्सर द्वारे धमकावण्यात आले.उलट त्या वृद्धेचा नातू आणि आणखी दोघांवर तोडफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

    या अपेक्स केअर हॉस्पिटल बद्दल रुग्णाच्या नातेवाईकाच्या तक्ररीची दखल घेत व अवाजवी व अवास्तव बिल मागितले जाते,रुग्णास केवळ दाखल करून घेतले जाते,उपचार केलेच जात नाहीत अशी तक्रार आमदार गोपीचंद पडळकर यांच्यसह अनेकांनी सांगलीचे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्याकडे केल्या होत्या तर आमदार पडळकर यांनी या हॉस्पिटलची मान्यताच रद्द करावी अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा दिला होता. 

    याची दखल घेत सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सदर अपेक्स केअर कोविड हॉस्पिटल मध्ये नवीन रुग्णांना दाखल करून घेऊ नये व आहे रुग्णांवर उपचार पूर्ण झाले कि हे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल बंद करण्यात यावे असे आदेश काढले आहेत. 

         कोरोना वरील उपचाराच्या नावाखाली राज्यात अनेक हॉस्पिटलकडून रुग्णांच्या नातेवाईकाची अक्षरश लुटू सुरु असल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे सातत्याने प्राप्त होत आहेत.पंढरपुरातही अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना गेल्या वर्षभरात अशा कटू अनुभवास सामोरे जावे लागले असून शासनाने निर्धारित केलेल्या दरानेच कोरोना बाधित रुगांवर डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल मध्ये उपचार होणे अपेक्षित आहे.तर अनेक वेळा रुग्णाची आर्थिक परिस्थिती पाहूनच राज्यातील काही हॉस्पिटल चालक रुग्णास ऍडमिट करून घेतात अशीही चर्चा होताना दिसून येते.

         पाच दिवसाच्या उपचारासाठी अडीच लाखाची मागणी करत,मृतदेह बारा तास अंत्यसंस्कारासाठी देण्यास नकार देण्याऱ्या हॉस्पिटल चालकास अखेर पंढरपुरातील युवकांनीच अद्दल घडविली आहे.आणि या हॉस्पिटलचा परवाना काढून घेण्यात आला आहे.

दरम्यान आज आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगलीत पत्रकार परिषद घेतली असून , रुग्णलयाबाहेर बाउन्सर ठेऊन रुग्णाच्या नातेवाईकांना त्यांना भेटण्यासाठी सोडले जात नाही, तसेच लाखो रुपयांची बिले आकारून लूट केली जात असल्याची तक्रार त्यांनी केली. जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी तक्रारीची गंभीर दखल घेत महापालिकेचे आयुक्त कापडणीस यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. आयुक्तांनी या रुग्णालयात आता नवीन रुग्ण नोंदणी करायची नाही असे आदेश दिले असल्याची माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिली.

तसेच महात्मा फुले आरोग्य योजना खाजगी रुग्णालयांनी गुंडाळून कृष्णेच्या डोहात टाकली आहे. अव्वाच्या सव्वा दराने लाखो रुपये लुटले जात आहेत. जिल्ह्यात अनेक मृत्यूची संख्या दाबली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी खुर्ची मधून उठून बाहेर येऊन गावात जाऊन आढावा घ्यावा. सगळे सुटा बुटातील अधिकारी ऑफिस मध्ये बसून काम करत आहेत अशी टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत केली.

     

    

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

14 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

14 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago