रुग्णास दाखल करून घेतले जाते,उपचारच केले जात नसल्याचा आ.पडळकर यांचा गंभीर आरोप
पंढरपूर शहरातील एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेस कोरोनाची लागण झाली,२६ एप्रिल रोजी पंढपुरात ऑक्सिजन बेड न मिळाल्याने वृद्धेच्या नातवाने त्या रुग्णास सांगली येथील अपेक्स केअर हॉस्पिटल येथे दाखल केले.३० एप्रिल रोजी दुपारपर्यंत उपचार सुरु आहेत असेच उत्तर वृद्ध महिला रुग्णाच्या नातवास व सुनेस देण्यात येत होते,आम्हाला पीपीई किट घालून तरी आत जाऊ द्या अशी विनंती केली पण एकदाही आत जाऊ दिले नाही असा आरोप या कुटूंबाचा आहे.३० एप्रिल रोजी सदर कोरोना बाधित वृद्धा मयत झाली असे नातवास सांगण्यात आले आणि अडीच लाख बिलाची मागणी करण्यात आली,एवढी रक्कम भरणे शक्य नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजेपर्यत सदर मयताचा मृतदेह अंत्यसंस्कारा साठी देण्यात अडवणूक करण्यात येत असल्याची तक्रार वृद्ध महिलेच्या नातवाने सांगलीतील मानवाधिकार कार्यकर्त्यांकडे केली तर पंढरपुरातही फोन लावले.यातून वादावादी झाली आणि हॉस्पिटलकडून मयत वृद्धेच्या नातवासह इतर दोघांवर तोडफोडीचा गुन्हा सांगली येथे दाखल केला गेला.
या गंभीर प्रकराबाबत पंढपुरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी व रुग्णाच्या नातेवाईकांनी आमदार गोपीचंद पडळकर याना फोन लावला व घडलेला सारा प्रकार सांगितला .याची तात्काळ दखल घेत आमदार गोपीचंद पडळकर हेही या प्रकरणानंतर अपेक्स केअर हॉस्पिटल येथे पोहोचले होते.आज सांगली येथील स्थानिक माध्यमाशी बोलताना आमदार गोपीचंद या हॉस्पिटलच्या व्यवस्थापनावर अनेक गंभीर आरोप केले असून येथे रुग्णास फक्त दाखल करून घेतले जाते, रुग्णावर उपचारच केले जात नाहीत असा गंभीर आरोप केला असून हे हॉस्पिटल बंद करण्यात यावे अशी मागणी आ.पडळकर यांनी सांगली जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.तर आमदार सदाभाऊ खोत यांच्यासह या हॉस्पिटल विरोधात रस्त्यावर उतरू असा इशारा सांगली येथील स्थानिक माध्यमाशी बोलताना दिला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…