देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडाला आहे. भविष्यातील हानी टाळायची असेल तर जलद लसीकरण हा एकच पर्याय सध्या आपल्यासमोर आहे. या संदर्भात आता एक सकारात्मक बातमी आली आहे. भारतात स्पुटनिक लाईट लसीच्या वापराला मंजुरी मिळाली आहे. वेगाने लसीकरण करण्यासाठी स्पुटनिक लाईट ही भारतासाठी संजीवनी ठरणार आहे. आता केंद्र सरकारनं या लसीला वापरासाठी मान्यता दिली आहे.रशियामध्ये स्पुटनिक लसीचा आणखी एक प्रकार विकसित केला आहे. स्पुटनिक लाईट असं या लसीचं नाव असून याचा एकच डोस पुरा असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यावूर्वी रशियन कंपनीची स्पुटनिक व्ही बाजारात उपलब्ध आहे.
रशियाची पहिला लस स्पुटनिक व्ही कोविड19 संसर्गाविरोधात 97.6 टक्के प्रभावी आहे, असे वैज्ञानिकांनी सांगितले होते. 3.8 दशलक्ष लोकांच्या आकडेवारीवर ही माहिती आधारित आहे. भारताला स्पुटनिक व्ही लसीचे 1.5 लाख डोस प्राप्त झाले आहेत. पुढील दोन दिवसांत आणखी 1.5 लाख डोस पोहोचण्याचा अंदाज आहे.
रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने आज (6 मे 2021) स्पुटनिक लाइट या लसीचा एक डोस वापरण्यास अधिकृत मान्यता दिली आहे. स्पुटनिक लाइट लसीचा एक डोस कोरोनाव्हायरस विरोधात 80 टक्के कार्यक्षम असल्याचं रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आरडीआयएफच्या मते रशियाच्या गमलेया संस्थेने तयार केलेली लस कोविड 19 विरूद्ध 79.4 टक्के प्रभावी आहे. स्पुटनिक लाईटची किंमत 10 डॉलरपेक्षा कमी असणार आहे. सध्या या लसीला फक्त रशियात परवानगी मिळाली आहे. कोरोनाविरोधात स्पुटनिक व्ही जगातली पहिली रजिस्टर्ड होणारी लस होती.
आरडीआयएफने एका निवेदनात म्हटले आहे: ‘स्पुटनिक लाइट लस दिल्यानंतर 28 दिवसानंतर घेण्यात आलेल्या विश्लेषणात्मक आकडेवारीनुसार 79.4 टक्के या लसीची कार्यक्षमता दिसून आली. रशियाच्या लसीकरण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 5 डिसेंबर 2020 ते 1 एप्रिल 2021 या कालावधीत हे लसीकरण करण्यात आले होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…