ताज्याघडामोडी

गुंगीचा पेढा देऊन महिलेकडील अडीच लाखाचे दागिने लंपास

एसटी प्रवासात शेजारी बसलेल्या महिलेने गुंगी येणारा पेढा खाण्यास देऊन महिलेला गुंगी आल्यानंतर तिला रुग्णालयात घेऊन जाऊन त्याठिकाणी एक्सरे काढताना गळ्यातील दागिने काढयला लावत अडीच लाख रुपये किंमतीची बॅग चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सुरेखा सुग्रीव जाधव (वय 50) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना पुण्यात यायचे होते. त्या मूळच्या मुंबई येथील आहेत. त्या दादर बस स्थानकावरून पुण्याच्या एसटीत बसल्या. यावेळी त्यांच्या शेजारी एक महिला येऊन बसली.त्या महिलेने बोलत बोलत त्यांना पेढा खाण्यास दिला. फिर्यादी यांनी पेढा खाल्ल्यानंतर त्यांना गुंगी आली. तसेच त्यांची जीभ देखील जड झाली होती. पुणे बस स्थानकावर आल्यानंतर आरोपी महिलेने फिर्यादी यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे गेल्यानंतर तुमचा एक्स-रे काढायचा आहे, असे सांगून फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढून फिर्यादीच्या बॅगमध्ये ठेवले. फिर्यादीने ही बॅग विश्वासाने आरोपी महिलेजवळ दिल्यानंतर महिला पसार झाली. अधिक तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

5 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

2 weeks ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago