यवतमाळ – राज्यात सध्या लॉकडाऊनची स्थिती आहे. त्यामुळे अनेकजण लग्नासाठी खोळंबले आहेत. सध्या लग्नांचा कालावधी आहे. तर अनेकांनी लग्न उरकून घेतले आहे. मात्र विदर्भातील यवतमाळमधून लग्नासंदर्भातील धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका तरुणीने लग्नाआधीच भावी नवऱ्यावर विषप्रयोग केल्याचं उघड झालं आहे.
लग्नाच्या चार दिवस आधी ठरलेलं लग्न होऊ नये म्हणून होणाऱ्या नवऱ्याला शितपेयातून विष पाजण्याचा प्रयत्न तरुणीने केला. प्रियकराच्या सांगण्यावरून या तरुणीने होणाऱ्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्ना केला आहे. याबाबत तरुणीने नेर पोलिसांसमोर कबुली दिली आहे. त्यानंतर तरुणी आणि आरोपी प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
जळगावातील नेर तालुक्यातील कोहळा येथील २२ वर्षीय तरुणाचं बाभुळगाव तालुक्यातील मुलीशी लग्न ठरलं होतं. लग्नाची तारीख जवळ आली होती. त्यामुळे तरुणी आणि तिचा प्रियकर अस्वस्थ होते. यावर तोडगा म्हणून प्रियकरांने तरुणीला शितपेयातून भावी नवऱ्याला विष पाजण्यास सांगितलं. त्यानुसार तरुणीने होणाऱ्या नवऱ्याला लग्नाच्या चार दिवस आधी नेर येथील एका आईस्क्रीम पार्लरमध्ये बोलावून घेतलं. तेथे त्याला शीतपेयामध्ये विष पाजले, हे पोलीस तपासात उघड झाले आहे.
सुदैवाने नवरा मुलगा बचावला असून त्याच्यावर यवतमाळमध्ये १४ दिवस उपचार करण्यात आले. उपचारानंतर मुलावर विषप्रयोग झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार आयस्क्रीम पार्लर येथील सीसीटीव्ही तपासण्यात आले आणि मुलाच्या तक्रारीवरून गुन्ह्याचा उलगडा झाला.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…