ताज्याघडामोडी

उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी अतुल खूपसे पाटील यांची निवड पाच टीएमसीचा निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत तीव्र संघर्ष करण्याचा निर्धार

उजनी जलाशयातून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाच टीएमसी पाणी इंदापूरला पळवले असुन त्या निषेधार्थ जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आणि झालेल्या वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. आज या समितीची पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे बैठक पार पडली असून या समितीच्या अध्यक्षपदी शेतकरी नेते अतुल खूपसे पाटील तर सचिवपदी माऊली हळणवर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

दरम्यान या झालेल्या निवडी प्रभाकर देशमुख, शिवाजी कांबळे, प्रा.शिवाजी बंडगर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आल्या असुन या समितीच्या निवडी पुढीलप्रमाणे झाल्या आहेत. उपाध्यक्ष दत्ताभाऊ व्यवहारे व ॲड. बापूसाहेब मेटकरी, कार्याध्यक्ष सुहास घोडके, सहसचिव किरण भांगे, सरचिटणीस आण्णा जाधव, खजिनदार अभिजित पाटील, तसेच सदस्य विठ्ठल मस्के, दिपक वादेकर, दिपक भोसले, धनाजी गडदे, बळीराम गायकवाड, श्रीकांत नलावडे, संभाजी पवार, संतोष चव्हाण, आप्पासाहेब गवळी, मच्छिंद्र वाघमारे, जयसिंह पाटील, बापू वसेकर, प्रशांत करळे, सुभाष पाटील माऊली जवळेकर यांच्या निवडी करण्यात आल्या.

यावेळी प्रवीण नाईकनवरे, आशिष बंडगर, पांडुरंग खरात, नानासाहेब चव्हाण, औदुंबर गायकवाड, नितीन कोळेकर यांच्यासह शेतकरी व चळवळीतील नेते उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 hour ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago