कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यांचे गांभीर्य पाहता पंढरपूर – मंगळवेढा मधील डाॅक्टर यांनी ऑक्सिजन संदर्भात झालेल्या चर्चेनुसार विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे यांनी दि.04.05.2021 रोजी टेंभुर्णी येथील एस.एस. बॅग्स ऑण्ड फिलर्स प्रा.लि. या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पास तात्काळ प्रत्यक्ष भेट दिली. येथील ऑक्सिजन निर्मिती स्वरूप अनुषंगाने येणाऱ्या अडी – अडचणी आ. आवताडे यांनी जाणून घेतल्या व त्यावर या प्रकल्पाचे चालक मा. प्रभाकर शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. सद्या काळात 24 तास प्लॅट चालूनही ऑक्सिजन पुरवठ्याची खूप मोठी टंचाई असल्यामुळे त्याचा तुटवडा निर्माण होत आहे. कमी ऑक्सिजन पुरवठ्यामुळे अनेक कोरोनाबाधित रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आ. समाधान आवताडे यांनी या भेटीदरम्यान FDI अधिकारी व जिल्हाधिकारी यांना भ्रमणध्वनी वरून या प्रकल्पा संबधित माहिती व अडचणीची माहिती दिली. दि.05.05.2021 रोजी सकाळी 11.00 वा बैठकीची वेळ घेतली.
याबैठकी मध्ये पंढरपूर – मंगळवेढा मतदार संघात निर्माण झालेल्या कोरोना स्थिती अनुषंगाने त्यांनी येथील ऑक्सिजन तुटवडा, रेमडिसिवर इंजेक्शन तसेच वॅक्सशीन या बाबत जिल्हाधिकारी यांचे सोबत मिटिंग घेण्याचे नियोजन केले बाबतची चर्चा होणार असले बाबत आ. आवताडे यांनी सांगीतले.
आ.समाधान आवताडे यांनी पंढरपूर मंगळवेढा-पंढरपुर मतदारसंघात ऑक्सिजन पुरवठा कमी होत असल्याने टेंभुर्णी येथील ऑक्सिजन पुरवठा करत असलेल्या प्लॅटला रात्री भेट देवुन पुरवठय़ा कमी होत असले बाबत व असलेल्या अडचणी बाबत चर्चा करुन जिल्ह्यधिकारी व FDI अधिकारी यांचेशी फोन व्दारे चर्चा करुन घेतली होती.
जिल्ह्यधिकारी व FDI अधिकारी यांनी आज तत्परता दाखवुन सदरील ऑक्सिजन प्लंटला निर्मितीचा कोठा वाढवून दिला. यामुळे पंढरपूर व मंगळवेढा मधील ऑक्सिजनसुरळीत होणार असुन, अनेकांचे जीव वाचणार आहेत त्याबद्दल आ. समाधान आवताडे यांनी आभार व्यक्त केले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…