ताज्याघडामोडी

15 मेनंतर WhatsApp वापरता येणार नाही, डिलीट होऊ शकतं अकाउंट

नवी दिल्ली, 4 मे : इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करत असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. 15 मे पूर्वी नव्या प्रायव्हसी पॉलिसीचा स्वीकार करावा लागले, अन्यथा व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यास समस्या येऊ शकते किंवा व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट बंदही होऊ शकतं. जानेवारी 2021 मध्ये कंपनीने आपल्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये बदल केले होते. या पॉलिसीअंतर्गत युजर्ससाठी नवे नियम-अटी रोल आउट करण्यात आले होते.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, युजर्सला कंपनीच्या या पॉलिसीचा स्वीकार करावा लागेल. कारण ही पॉलिसी रिजेक्ट करण्याचा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. व्हॉट्सअ‍ॅपची नवी प्रायव्हसी पॉलिसी 8 फेब्रुवारी रोजी लागू होणार होती.परंतु ही तारीख वाढवून 15 मे करण्यात आली आहे. अनेक वादांनंतर, तसंच युजर्समधील गोंधळाच्या वातावरणानंतर ही प्रायव्हसी पॉलिसी तीन महिन्यांसाठी टाळण्यात आली होती.

बंद होणार WhatsApp –

15 मे रोजी WhatsApp नवी पॉलिसी लागू करणार आहे. जर एखाद्या युजरने व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीचा स्वीकार केला नाही, तर युजर 15 मेनंतर व्हॉट्सअ‍ॅपवर कोणताही मेसेज पाठवू शकणार नाही किंवा मेसेज येणारही नाहीत.

120 दिवसांनंतर डिलीट होणार अकाउंट –

15 मेपूर्वी युजर्स अँड्रॉईड आणि आयफोनमधून आपली चॅट हिस्ट्री डाउनलोड करू शकतात. मात्र 120 दिवसांनंतर इनअ‍ॅक्टिव्ह अकाउंट्सची चॅट हिस्ट्री मेसेज, कॉल्स, फोटो, व्हिडीओ सर्व डिलीट होईल.

WhatsApp च्या New Privacy Policy बाबत संपूर्ण देशभरातून विरोध करण्यात आला आहे. भारतात व्हॉट्सअ‍ॅपचे सर्वाधिक युजर्स आहेत. नव्या पॉलिसीबाबत युजर्सकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. व्हॉट्सअ‍ॅपची नवी पॉलिसी सर्व युजर्सना ऍक्सेप्ट करावी लागणार आहे. आपली खासगी माहिती, चॅट शेअर होण्याच्या भीतीने अनेकांनी WhatsApp ला इतर पर्याय शोधले आहेत. मात्र WhatsApp ने याचं खंडन करतं, प्रायव्हेट चॅट शेअर होणार नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. सर्व चॅट end-to-end encryption ने प्रोटेक्टेड असतात. त्यामुळे कोणीही युजरचं प्रायव्हेट चॅट अ‍ॅक्सेस करू शकत नसल्याचा दावा Whatsapp ने केला आहे. तसंच प्रत्येक चॅटमध्ये व्हॉट्सअ‍ॅप end-to-end encryption चं लेबल देतं, जेणेकरुन युजर्सला त्यांचं चॅट सुरक्षित असल्याचं समजेल.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर सिंहगडच्या प्लेसमेंटची भरारी; फ्रीस्टीन इन्फोटेकमध्ये चार विद्यार्थ्यांची निवड

संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक ४ लाखांचे पॅकेज पंढरपूर : प्रतिनिधी अत्याधुनिक शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि…

4 days ago

पंढरपूर सिंहगडच्या प्लेसमेंटचा डंका; सानिकाला ९ लाखांचे पॅकेज

कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाची विद्यार्थिनी…

6 days ago

अजितदादांच्या जयंतीनिमित्त अजितदादा सुकन्या योजना राबविणार

लोकनेता पुरस्कार देवून सन्मान करणार - राष्ट्रवादीचे श्रीकांत शिंदे यांचा स्तुत्य उपक्रम लोकनेते तथा महाराष्ट्राचे…

1 week ago

स्थापत्य अभियांत्रिकी विभागात व्हॅल्यू एडिशन प्रोग्राम उत्साहात संपन्न

पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूटच्या प्रा. बाबर व प्रा. लंबे यांच्या संशोधनाला भारत सरकारचे पेटंट

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पंढरपूर येथील प्राध्यापक डॉ. अनिल बाबर आणि…

2 weeks ago

पंढरपूर सिंहगडच्या दोन विदयार्थ्यांची स्टर्लिंग अँड विल्सन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये निवड वार्षिक ५ लाख पॅकेजची नोकरी

पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनियरींग विभागात चतुर्थ…

2 weeks ago