लखनऊ 04 मे : कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. अशा परिस्थितीमध्ये कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी डॉक्टर आणि पोलीस दिवसरात्र काम करत आहेत. मात्र, आपल्या कुटुंबावर संकट ओढावलेलं पाहाताना त्यांनाही कुटुंबासाठी वेळ काढणं गरजेचं आहे. अशात आपल्या पत्नीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं मुलीची जबाबदारी स्वतःवर पडल्यानं मनीष सोनकर या सर्कल ऑफिसरनं तिची काळजी घेण्यासाठी सुट्टी मागितली. मात्र, सुट्टी मिळत नसल्याचं कारण देत त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आहे.
सोनकर हे उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये सर्कल ऑफिसर होते.
मनीष सोनकर 2005 च्या तुकडीतील PPS अधिकारी असून सध्या ते झाशीचे सर्कल ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. मनीष सोनकर यांनी आपल्या राजीनाम्याची प्रत झाशीचे एसएसपी रोहन पी कनय आणि राज्यपालांकडेही पाठवली आहे. याबाबतची माहिती स्वतः रोहन पी कनय यांनी न्यूज १८ सोबत बोलताना दिली आहे. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
कोरोना काळातही कामावर जात असल्यानं सोनकर हे घरामध्येही आपल्या पत्नी आणि मुलीच्या सुरक्षिततेसाठी वेगळ्या खोलीत राहात होते. मात्र, दोन आठवड्यांपूर्वी त्यांच्या पत्नीला अचानक ताप येण्यास सुरुवात झाली. यापाठोपाठ 20 एप्रिलला सोनकर यांनाही ताप आला. यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केली मात्र ती पाच वेळा निगेटिव्ह आली. त्यामुळे, सोनकर आपल्या कामावर जात राहिले. मात्र, पुढे 30 एप्रिलला त्यांच्या पत्नीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं. अशात मुलीला सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी सोनकर यांच्याकडे आली. मात्र याच काळात पंचायत निवडणुकांच्या मतमोजणीसाठी सोनकर यांची नियुक्ती केली गेली.
या परिस्थितीमध्ये मुलीची काळजी घेणं जास्त गरजेचं असल्यानं सोनकर यांनी ताबडतोब एसएसपींसोबत चर्चा केली आणि त्यांना या संपूर्ण परिस्थितीबाबत माहिती दिली. त्यांना यासाठी सुट्टीही मागितली मात्र त्यांची नियुक्ती २ आणि ३ मेपर्यंत पंचायत निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावर करण्यात आली. याच कारणामुळे मुलीच्या देखभालीसाठीही सुट्टी मिळत नसल्यानं सोनकर यांनी थेट राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता त्यांना सुट्टी देण्यात आली असून त्यांचा राजीनामा अद्याप स्विकारलेल्या नाही. याप्रकरणी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असं कानपूर झोनचे एडीजी भानू भास्कर यांनी सांगितलं आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…