नवी दिल्ली – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ११२ या हेल्पलाइनशी संबंधित व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून देण्यात आली आहे. पोलिसांनी या मेसेजची दखल घेतली असून गुन्हा दाखल केला.यापूर्वी ही योगी यांना जीवे मारण्याची धमकी मिळण्याची घटना घडली होती. या प्रकरणामध्ये ज्या क्रमांकावरुन मेसेज आला आहे त्या व्यक्तीचा शोध पोलिसांनी सुरु केलाय.
पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून योगी आदित्यनाथ यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलिसांना आलेल्या या मेसेजमध्ये योगी यांच्या मुख्यमंत्री योगींकडे चार दिवसांचा वेळ शिल्लक असल्याचा उल्लेख करण्यात आलाय.
पुढील चार दिवसात माझं जे काही करायचं आहे ते करा, पाचव्या दिवशी मुख्यमंत्री योगी यांना मी ठार मारणार आहे, असं या धमकीत म्हटलं आहे. हा मेसेज आल्यानंतर पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबरोबर ५० ठिकाणांची सुरक्षा वाढवली आहे.मागील महिन्यामध्येही उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना अशी धमकी मिळाली होती. मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्याची धमकी देण्याप्रकरणी मुंबईमधील एका तरुणाला पोलिसांनी अटक केली होती. सोशल मिडिया डेस्कच्या मदतीने पोलिसांनी ही कारवाई केली होती. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव कमरान आमीन आहे. कमरानने पोलिसांच्या सोशल मिडिया डेस्कवर फोन करुन धमकी दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास केला आणि या व्यक्तीचा ठाव ठिकाणा शोधून काढला. त्यानंतर मुंबईमधील दहशतवादी विरोधी पथकामने कमरानला अटक केली. त्यानंतर कमरानला उत्तर प्रदेश एटीएसच्या ताब्यात देण्यात आला.
चौकशीदरम्यान कमरानने ही धमकी देण्याठी आपल्याला एक कोटी रुपये देण्यात येणार असल्याची ऑफर मिळाल्याचा खुलासा केला. मात्र ही ऑफर कुणी दिली होती हे त्याने सांगितलं नाही. योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यापासून त्यांना अनेकदा अशाप्रकारच्या धमक्या मिळाल्या आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…