नवी दिल्ली – धमकी प्रकरणी सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावला यांनी पत्रक काढून आपली बाजू मांडली आहे. गेल्या दोन दिवसात सरकारने ऑर्डर न दिल्यामुळे निर्मिती मंदावल्याच्या बातम्या येत होत्या. पण त्यांनी या बातम्याचे खंडन करत पत्रकाद्वारे आपली बाजू मांडली आहे. सरकारकडून आम्हाला सर्वोतोपरी मदत मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आल्यामुळे स्पष्टीकरण देत आहे. लस निर्मिती एक प्रक्रिया असून उत्पादन एका रात्रीत वाढवणे शक्य नाही. हे आपल्या सर्वांना समजले पाहिजे. भारताची लोकसंख्या खूप मोठी आहे. सर्वांसाठी पुरेसे ड़ोस तयार करणे सोपे काम नाही.
अगदी विकसित देशातील कंपन्याही संघर्ष करत असल्याचे अदर पूनावाला यांनी ट्विटरवर टाकलेल्या पत्रात म्हटले आहे.
आम्ही गेल्या एप्रिल महिन्यापासून सरकारसोबत काम करत आहोत. सरकारकडून आम्हाला सर्वोतोपरी मदत मिळत आहे. शास्त्रज्ञ, नियोजन आणि आर्थिक पातळीवर सहकार्य मिळत असल्याचेही त्यांनी पुढे पत्रात नमुद केले आहे.
आम्हाला आतापर्यंत २६ कोटींहून अधिक डोससाठी ऑर्डर्स मिळाल्या आहेत. त्यापैकी १५ कोटीहून अधिक डोस आम्ही पुरविले आहेत. तर पुढच्या ११ कोटी डोससाठी आम्हाला १०० टक्के आगाऊ रक्कमदेखील मिळाली असल्यामुळे लवकरच राज्य आणि खासगी रुग्णालयांना डोस पुरविले जातील. आम्हाला देखील प्रत्येकाला लस मिळावी असे वाटत आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. ती मागणी आम्ही पूर्ण करू आणि कोरोनाविरुद्धचा लढा लढू, असे आपल्या पत्रकात त्यांनी स्पष्ट केले आहे.
नुकतेच एका मुलाखतीत धमकवणारे फोन येत असल्याचा खुलासा अदर पुनावाला यांनी केला होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. सध्याच्या परिस्थितीला कोणाला जबाबदार ठरवता येईल, यासंदर्भात मी कोणाचे नाव घेतले किंवा उत्तर दिले, तर माझा शिरच्छेद केला जाईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…