सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पुनावाला यांनी कोरोना लशीच्या उत्पादनाचा प्रचंड दबाव असल्याचं म्हटलं आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट अत्यंत रौद्र रुप घेऊन आली, त्यामुळं कोविशिल्ड लसीच्या वाढलेल्या मागणीची पूर्तता करताना प्रचंड तणावात असल्याचं त्यांनी म्हटलं.
सीरम इन्स्टिट्यूटच्या वतीनं देशात कोविशिल्ड या लशीची निर्मिती केली जात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर लशीची मागणी अचानक प्रचंड वाढली. यादरम्यान देशातल्या काही अत्यंत शक्तीशाली लोकांचे फोन आले. त्यांची भूमिका अत्यंत आक्रमक होती, असं पुनावाला यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे. गेल्या आठवड्यातच पुनावाला यांना सरकारनं Y प्रकारची सुरक्षा प्रदान केली होती. या संपूर्ण परिस्थितीत निर्माण झालेल्या दबावामुळं पुनावाला हे लंडनला त्यांच्या पत्नी आणि मुलांबरोबर वेळ घालवायला गेले असं त्यांनी सांगितलं.
परत भारतात त्याच परिस्थितीत परतायची इच्छा नसल्यामुळं लंडनमध्ये अधिक काळ राहत असल्याचं पुनावाला म्हणाले आहेत. सर्वकाही माझ्या खांद्यांवर येऊन पडलं आहे, पण मी एकटा काहीही करू शकत नाही. तुम्ही तुमचे काम करत असताना केवळ एखाद्या अमक्या, तमक्याच्या गरजा पूर्ण करू शकला नाहीत म्हणून ते काय करतील याची तुम्हाला कल्पनाही नसेल अशा परिस्थितीत परतण्याची इच्छा नसल्याचं त्यांनी मुलाखतीत म्हटलं आहे.
प्रत्येकाच्या खूप अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करण्याची आक्रमकताही तशीच आहे. प्रत्येकाला वाटते त्यांना लस मिळावी. पण एखाद्याला आधी का मिळायला हवी हे कोणीही समजून घेत नसल्याचं पुनावाला म्हणाले. भारताबाहेरही लसीचं उत्पादन सुरू करता यावं हेही त्यांचं लंडनला येण्यामागचं एक कारण असल्याचंही त्यांनी सांगितलं. याबाबत पुढील काही दिवसांत घोषणा होईल असंही ते म्हणाले.
सीरम इन्स्टिट्यूटने वर्षभरात लस उत्पादनाची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे. तसंच मोठ्या प्रमाणावर साठाही तयार केला. जगात इंग्लंडसह 68 देशांत आम्ही लसीचा पुरवठा सुरू केला. पण गेल्या काही आठवड्यांत भारताची स्थिती प्रचंड खराब झाली. एवढं वाईट होईल हे देवालाही माहिती नसेल असंही पुनावाला म्हणाले. लसीच्या किंमतीबाबत बोलताना ही आजही सर्वात स्वस्त लस असल्याचं म्हटलं. तसंच इतिहासात याबाबत काय बोललं जाईल याची वाट पाहीन असंही ते म्हणाले. आम्ही लसी तयार करतो म्हणून आम्हाला जबाबदारीची जाणीव आहे. पण आम्हीही लोकांचे जीव वाचवण्यासाठी यापूर्वी कधी लसी बनवल्या नव्हत्या असंही पुनावाला म्हणाले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…