ताज्याघडामोडी

मे महिन्यात 12 दिवस बंद राहाणार बँका

नवी दिल्ली, 01 मे: सध्या कोरोना विषाणूची दुसरी लाट देशात धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे यावर्षीचा मे महिना खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तज्ज्ञांच्या मते मे महिन्याच्या मध्यावर कोरोना रुग्णांचा आकडा उच्चांक गाठेल. त्यामुळे देशात विविध ठिकाणी कोरोना विषाणूबाबतचे नियम आणखी कठोर केले जातील. या दरम्यान बॅंकाच्या कामकाजावरही याचा परिणाम होऊ शकतो. बँकांची एक संस्था असणाऱ्या एसएलबीएसने अनेक राज्यांत बँकांच्या कामकाजाचे तास कमी करण्याचंही आवाहन केलं आहे. त्यामुळे मे महिन्यात बँकांशी संबंधित आवश्यक कामं अडकून पडू शकतात. त्यामुळे बँकांच्या सुट्ट्या लक्षात घेऊन आपण बँकेतील कामं व्यवस्थापित केली पाहिजेत.

आरबीआयच्या वेबसाइटनुसार, मे महिन्यात एकूण 12 दिवस बँका बंद राहणार आहेत. ज्यामध्ये महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारसह रविवारचाही समावेश आहे. तथापि, आरबीआयच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सुट्ट्यांच्या यादीमध्ये काही सुट्ट्या अशा आहेत, ज्या संपूर्ण देशात एकाच वेळी साजऱ्या केल्या जात नाहीत. काही सुट्ट्या किंवा सण-उत्सव स्थानिक राज्य पातळीवर वेगवेगळ्या दिवशी साजऱ्या केल्या जातात. त्यामुळे सर्व राज्यांत 5 दिवसांची सुट्टी होणार नाही.

या दिवशी असणार बँका बंद

1 मे 2021 – हा दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी काही राज्यांच्या बँका बंद राहतील. यामध्ये कोलकाता, कोची, मुंबई, नागपूर, पणजी, पटना, चेन्नई, तिरुअनंतपुरम, हैदराबाद, गुवाहाटी, इम्फाल, बंगलुरू आणि बेलापूर अशा ठिकाणांचा समावेश आहे.

-7 मे 2021 या दिवशी Jumat-ul-Vida असल्यानं बँका बंद राहणार आहेत. यादिवशी रमझानचा शेवटचा जुम्मा नमाज अदा केला जाईल. यानिमित्ताने फक्त जम्मू आणि श्रीनगरमधील बँका बंद राहणार आहेत.

– 13 मे 2021 रोजी Id-Ul-Fitr आहे. त्यामुळे बेलापूर, जम्मू, कोची, मुंबई, नागपूर, श्रीनगर आणि तिरुवनंतपुरम येथे या दिवशी बँका बंद राहणार आहेत.

– 14 मे 2021- या दिवशी भगवान श्री परशुराम जयंती / रमझान-ईद / बसवा जयंती आणि अक्षय तृतीया एवढे सण आहेत. त्यामुळे या दिवशी बऱ्याच शहरातील बँका बंद राहणार आहेत.

– 26 मे 2021 रोजी बुद्ध पौर्णिमा असल्यानं आगरतळा, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, देहरादून, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची आणि शिमला आणि श्रीनगर याठिकाणी बँका बंद राहणार आहेत.

या व्यतिरिक्त 8 व 22 मे रोजी महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवार आहे. त्यामुळे या दिवशीही बँकांमध्ये कोणतीही कामं होणार नाहीत. त्याचबरोबर 2, 9, 16, 23 आणि 30 मे रोजी रविवार असल्यानं सर्व बँकाना साप्ताहिक सुट्टी असेल. त्यामुळे मे महिन्यांत एकूण 12 दिवस बॅंका बंद राहणार आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

15 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

15 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago