कोरोनामुळे देशात चिंतेचं वातावरण आहे. रुग्णसंख्येत आणखी किती वाढ होणार, याबद्दल काहीही अंदाज नाही. अशात आता शुक्रवारची रुग्णसंख्या समोर आली असून रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढच होत असल्याचं चित्र आहे. शुक्रवारी चोवीस तासात देशात 4 लाखाहून अधिक रुग्ण आढळले आहेत. देशात शुक्रवारी आतापर्यंतचे सर्वाधिक 4 लाख 02 हजार 110 नवीन रुग्ण आढळले आहेत. यानंतर एकूण बाधितांची संख्या 1 कोटी 91 लाख 57 हजार 094 इतकी झाली आहे. यासोबतच देशातील सक्रीय रुग्णांची संख्याही 32 लाखाहून अधिक झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी एका दिवसात कोरोनामुळे 3522 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यानंतर कोरोनानं आतापर्यंत जीव गमावलेल्यांची संख्या 2,11,836 वर पोहोचली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येतही सातत्यानं वाढ होत आहे. ही संख्या आता 32,63,966 वर पोहोचली आहे. एकूण बाधितांच्या संख्येत हा आकडा 16.90 टक्के इतका आहे. रिकव्हरी रेट घटून 81.99 टक्के झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनातून 1,56,73,003 लोक बरे झाले आहेत. तर, मृत्यूदर 1.11 टक्के आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…