नवी दिल्ली : शास्त्रज्ञांनी कोरोना विरोधातील नवीन लसीचा शोध लावला असल्याचा दावा करणारी बातमी एका वेबसाइटवर देण्यात आली आहे. संबंधित नवी लस कोरोनाचे सर्व प्रकार आणि अवतार आणि भविष्यात उदभवणाऱ्या संभाव्य अवतारांवरही परिणामकारक ठरणार असल्याचे, थोडक्यात कोरोनाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणारी ठरणार असल्याचे त्या बातमीत म्हटले आहे. त्यामुळेच ही नवीन लस ‘सुपर लस’ म्हणून ओळखली जाणार आहे.
नावीन्यपूर्ण पध्दतीचा उपयोग करुन लस तयार करण्यात आली आहे. यासाठी यूव्हीए हेल्थचे स्टीव्हन एल. झेचनेर आणि व्हर्जिनिया टेकचे झियांग-जिन मेंग या संशोधकांनी सुपर व्हॅक्सिनचा शोध लावला आहे. कोविड-19च्या सध्याच्या व्हेरियंटवर ही नवीन लस अधिक प्रभावी ठरणारी आहेच.
शिवाय कोरोनाच्या कोणत्याही नव्या स्ट्रेनवर रामबाण ठरणार आहे. त्यामुळे ही व्हॅक्सिन घेतल्यानंतर कोरोनापासून अधिक सुरक्षा मिळणार आहे, असा दावा करण्यात आला आहे तसेच या लसीचा एकच डोस पुरेसा असेल असेही सांगण्यात आले आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…