अमरावती : बांधकामासाठी लागणार्या वाळुवरुन सुरु असलेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणाची तिघांनी निर्घुण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
वैभव भीमराव तायडे (वय २२, रा. चवरेनगर, अमरावती) असे हत्या झालेल्या तरुणांचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दीपक तुरट (वय २५), संकेत घुगे (वय २५), शुभम कुकडे (वय २६, रा. अमरावती) यांना अटक केली आहे. ही घटना गोपालनगरजवळील स्वागतम कॉलनीत गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि वैभव तायडे याची मानलेली बहीण यांच्यात बांधकामाच्या वाळुवरुन वाद होता. या वादात मध्यस्थी करण्यासाठी तायडे रात्री आरोपींकडे गेला होता.
त्यावेळी झालेल्या भांडणात आरोपींनी सेंट्रींग राफटरणे वैभवच्या चेहर्यावर मारुन वार केले. गंभीर जखमी झालेल्या वैभवला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असता डॉक्टर तपासणीपूर्वी त्याचा मृत्यु झाला. या घटनेची माहिती मिळताच राजा पेठ पोलीस ठाण्यातील अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तिघांना ताब्यात घेतले.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…