लातूर : एकीकडे कोरोनाचा सामना करण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियम कडक करण्यात आले आहे. तर दुसरीकडे चाकूर नगरपंचायत येथील पाणी पुरवठा आणि स्वछता विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांची कोरोनाचे नियम मोडून सुरु असलेली मटन आणि दारु पार्टी गावकऱ्यांनी उघडकीस आणली आहे. या पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये संबंधित कर्मचारी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, अशी माहिती तहसीलदारांनी दिली आहे.
अभियंता प्रमोद कास्टवाड, दिवाबत्ती कर्मचारी मुकुंद मस्के, लिपिक व्यंकट सूर्यवंशी, नियंत्रण प्रमुख सचिन होलबे यांनी मटन आणि दारू पार्टी आयोजित केली होती.
चाकूर शहराच्या बाहेरील एक हॉटेलमध्ये ही पार्टी सुरु होती. याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. कोरोना काळात नगरपंचायत कर्मचारी हे सर्व निर्बंध पायदळी तुडवत आहेत याची खातरजमा करावी म्हणून गावकरी तेथे गेले. त्यावेळी हॉटेलच्या आतील रूममध्ये हे सर्व कर्मचारी दारू पित आणि मटन खाताना आढळून आले.
काही तरुण मुलांनी या पार्टीचा व्हिडीओ शूट केला. यावेळी तेथील कर्मचारी आणि ग्रामस्थांमध्ये झटापट झाली. काही वेळात हे व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाले. ग्रामस्थानी या घटनेची लेखी तक्रार चाकूरचे तहसीदार शिवानंद बिडवे यांच्याकडे केली आहे. यातील दोषी लोकांवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन तहसील कार्यालयस प्राप्त झाले आहे.
चाकूर नगरपंचायतीचे मुख्यअधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्याशी पत्र व्यवहार करून यातील सत्य काय आहे याची चौकशी करावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. संबंधित अधिकारी, कर्मचारी दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती चाकूरचे तहसीलदार शिवानंद बिडवे यांनी दिली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…