गुन्हे विश्व

धक्कादायक! प्रेयसीच्या मदतीने पतीने 7 वर्षांच्या मुलासह पत्नीला दिला गळफास

दौंड, 28 एप्रिल: प्रेमात अडथळा येत असल्यामुळे एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीच्या मदतीने पत्नी आणि 7 वर्षांच्या मुलांची हत्या केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पती सचिन सोनवणेला पोलिसांनी अटक केली आहे.

दौंड तालुक्यातील पाटस येथील स्वराज सोसायटीमध्ये  7 वर्षाच्या मुलासह आईचा गळफास घेतल्याच्या अवस्थेतील मृतदेहाचा उलगडा अवघ्या काही तासात यवत पोलिसांनी केला आहे. मंगळवारी लीना सचिन सोनवणे आणि ओम सोनवणे या मायलेकरांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला होता.

घरातील 10 वर्षांच्या वैष्णवीने आपल्या सात वर्षाच्या भावाला आणि आईला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये पाठवले होते.  त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. मुलीचा जबाब घेऊन पोलिसांनी पती सचिन सोनवणेची प्राथमिक चौकशी केली.

यवत पोलिसांनी सखोल चौकशी केली असता हा खूनच असल्याचे निष्पन्न झाले. पती सचिन सोनवणे याने प्रेयसीच्या मदतीने पत्नी आणि मुलाचा खून केल्याचे कबुल केले. अवघ्या एका दिवसात या खुनाचा छडा लावून आरोपीला जेरबंद करण्यात यवत पोलिसांना यश आले आहे. सचिन सोनवणे या आरोपीस पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अधिक तपास पोलीस करत आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 hour ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago