ताज्याघडामोडी

18+ लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता देशात लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. येत्या 1 मे पासून 18 वर्षांवरील व्यक्तींना देखील लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक आहे. ही ऑनलाईन नोंदणी कुठे करायची? त्याचे रजिस्ट्रेशन केव्हा पासून सुरु होईल? या सर्वांची माहिती जाणून घेऊया…

येत्या 1 मे पासून 18 ते 45 वर्षे वयोगटातील व्यक्तींना लसीकरण केले जाणार आहे. यासाठी Aarogya Setu ॲप, UMANG ॲप, किंवा cowin.gov.in या वेब पोर्टल द्वारे कोरोना लसीची ऑनलाईन नोंदणी करू शकता. करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक आहे. 28 एप्रिल म्हणजेच आज बुधवारी संध्याकाळी 4 वाजल्यापासून लसीकरणासाठी तुम्ही नोंदणी करू शकता.

आरोग्य सेतु Aarogya Setu अ‍ॅपद्वारे नोंदणी कशी करावी

१.आरोग्य सेतू Aarogya Setu अ‍ॅप उघडा आणि होम स्क्रीनवर उपलब्ध असलेल्या (CoWIN tab) कोविन टॅबवर क्लिक करा.

२)’लसीकरण नोंदणी’ ‘(Vaccination Registration)’ निवडा आणि नंतर आपला फोन नंबर प्रविष्ट करा. आपल्याला एक ओटीपी (OTP) प्राप्त होईल आणि नंतर आपण Verify’ वर क्लीक करून पुढे जाऊ शकता.

३)पुढच्या पानावर फोटो आयडी पुरावा, नाव, लिंग आणि जन्म वर्षासह सर्व तपशील प्रविष्ट करा. ‘नोंदणी’ (Register)वर क्लिक करा.

४)तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला अपॉईंटमेंट शेड्यूल (Schedule) करण्याचा पर्याय मिळेल. नोंदणी केलेल्या व्यक्तीच्या नावाच्या शेड्यूलवर(Schedule) क्लिक करा.

५)आपला पिन कोड जोडा आणि search पर्यायावर क्लिक करा. जोडलेल्या पिन कोडमधील केंद्रे दिसून येतील.

६)तारीख आणि वेळ निवडा आणि ‘Confirm’ वर क्लिक करा.

कोविन CoWIN पोर्टलद्वारे नोंदणी कशी करावी

१)कोविन वेबसाइटला भेट द्या आणि Register/Sign in वर क्लिक करा.

२)तुमचा मोबाईल नंबर टाइप करा आणि GET OTP वर क्लिक करा. OTP प्राप्त झाल्यानंतर, साइटवर अंक टाइप करा आणि ‘Verify’ वर क्लिक करा.

३)आता तुमची सर्व माहिती भरा. तुमचा फोटो, आयडी पुरावा, नाव, लिंग आणि जन्म वर्षासह आपले सर्व तपशील प्रविष्ट करा. एकदा हे झाल्यावर, नोंदणी ‘Register’ दाबा.

४)तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला अपॉईंटमेंट शेड्यूल करण्याचा पर्याय मिळेल. नोंदणी केलेल्या व्यक्तीच्या नावापुढे ‘Schedule’ वर क्लिक करा.

५)आपला पिन कोड जोडा आणि search पर्यायावर क्लिक करा. जोडलेल्या पिन कोडमधील केंद्रे दिसून येतील.

६)तारीख आणि वेळ निवडा आणि ‘Confirm’ वर क्लिक करा.

ही बाब लक्षात घेणे महत्वाचे आहे की, वापरकर्ते एकाच लॉगिनद्वारे चार सदस्यांची नोंदणी करू शकतो. आणि सहजपणे भेटीचे वेळापत्रक निश्चित करू शकतात

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

13 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

13 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago