ताज्याघडामोडी

डॉक्टरी पेशाला काळीमा, कोविड सेंटरमध्ये शरीरसुखाची मागणी करणारा डॉक्टर गजाआड

नागपूर, 28 एप्रिल : कोरोनाच्या संकटात डॉक्टर जिवाची बाजी लावून रुग्णांची सेवा करत आहे. पण नागपुरात डॉक्टरीपेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. कोविड सेंटरमध्ये एका डॉक्टराने सहकारी महिला डॉक्टरावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. डॉ. नंदू रहांगडाले असं या डॉक्टराचं नाव आहे. या डॉक्टराने नागपूरच्या कोराडी मार्गावरील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये शारीरिक सुखाची मागणी करुन महिला डॉक्टरावर हॉस्पिटलमध्येच अत्याचाराचा प्रयत्न केला.

याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी विनयभंगाचा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून डॉक्टरला अटक केलेली आहे.

मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये कोवीड केअर सेंटर आहे. पीडित 24 वर्षीय महिला डॉक्टर काही दिवसांपूर्वी मेडिकेअरमध्ये कामाला लागली. तेंव्हापासून डॉक्टर नंदू याची वाईट नजर महिला डॉक्टरवर होती आणि सोमवारी रात्री महिला डॉक्टर खोलीत होती. तेव्हा डॉ. नंदू रहांगडाले हा खोलीत आला आणि महिला डॉक्टरला शरीरसुखाची मागणी केली.

महिला डॉक्टराने याला नकार दिला. त्यामुळे नंदू याने शिवीगाळ करून महिलेसोबत अश्लील चाळे केले. तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पण प्रसंगवधान राखत महिलेने त्याला धक्का दिला आणि पळ काढला.

त्यानंतर तातडीने मानकापूर पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून नराधम डॉक्टराला अटक केलेली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago