दीप्ती काळे या महिलेने पुण्यातील ससून रुग्णालयाच्या 8व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली आहे. दीप्ती काळे ही महिला मोक्क्याच्या गुन्ह्यातील आरोपी होती. तिच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. दीप्ती काळे हिच्यावर पुण्यातील नामवंत सराफासह अनेक नागरिकांना ब्लॅकमेल केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच खंडणीचाही तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दीप्ती काळेवर पोलिसांनी मोक्कानुसार कारवाई केली होती. तसेच तिला अटकही करण्यात आली होती.
काही दिवसांपूर्वी दीप्ती काळे हिची कोविड चाचणी करण्यात आली होती आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.त्यानंतर तिला उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असलेल्या ससून रुग्णालयातील बाथरूमच्या खिडकीतून तिने उडी मारल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरुन पडल्याने दीप्ती गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला.
दीप्ती काळे हिने आत्महत्या केली की ती पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना खाली पडली याची माहिती मिळू शकलेली नाहीये. दीप्ती काळे ही रुग्णालयातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असावी आणि त्यावेळी ती खाली कोसळली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…