गुन्हे विश्व

खळबळजनक! प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या भावाची हत्या केल्याचा आरोप, प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक

हुबळी, 27 एप्रिल: प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री शनाया काटवे हिला हुबळी ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. तिच्या भावाच्या खून प्रकरणातील आरोपाखाली या अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे. 32 वर्षीय राकेश काटवेच्या खून प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. मीडिया अहवालानुसार राकेशचं डोकं धडावेगळं करण्यात आलं होतं, देवरगुडीहल वनक्षेत्रात कुजलेल्या अवस्थेत त्याचं डोकं आढळलं तर शरीराचा इतर भाग हुबळीतील गाडग रोड आणि इतर परिसरात आढळून आला आहे. मृतदेहाचे तुकडे करून ते शहरातील विविध ठिकाणी फेकण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
धारवाड जिल्हा पोलिसांनी शहरातील आणखी चार संशयितांना अटक केली आहे. नियाझअहमद कटिगार (वय 21), तौसिफ चन्नापूर (वय 21), अल्ताफ मुल्ला (वय 24) आणि अमन गिरणीवाले (वय 19) अशी अटक केली आहे. New Indian Express ने याबाबत वृत्त दिले आहे.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान असे आढळून आले की, राकेशची बहीण आणि अभिनेत्री शनायाचे या प्रकरणातील संशयित नियाझअहमदशी प्रेमसंबंध होते. राकेशने त्यांच्या प्रेमसंबंधांला विरोध दर्शवल्यामुळे त्याने हा कट रचल्याचा आरोप केला जात आहे.
शनाया काटवे, अभिनेत्री

9 एप्रिल रोजी अभिनेत्री जेव्हा तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शहरात गेली होती तेव्हा ही भयंकर घटना शनाया आणि राकेश यांच्या हुबळी येथील घरामध्ये घडली. राकेशची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कटिगार आणि त्याच्या साथीदारांनी त्यानंतर मृतदेहाचे तुकडे केले आणि ते शहरातील आणि आसपासच्या ठिकाणी फेकून दिले, अशी माहिती आहे.

मॉडेल-अभिनेत्री-शनायाने 2018 मध्ये कन्नड चित्रपट ‘इडम प्रेमम जीवनम’ या चित्रपटाद्वारे अभिनयात पदार्पण केले आणि अलीकडेच आलेला अडल्ड कॉमेडी सिनेमा ‘ओंदू घनतेया काथे’मध्ये ती दिसली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

13 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

13 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago